Top Newsइतर

मुंबईत ‘रेड अलर्ट’ ! मुख्यमंत्री तातडीने आपत्ती निवारण कक्षात !

पुढील ४ ते ५ दिवस कोकण किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई – मुंबई शहर आणि उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई आणि पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या फटका हा रस्ते वाहतुकीला बसला आहे. सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून मुंबईत दाखल होण्यासाठी आवश्यक हवामान तयार झाल्याने मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होईल, अशी शक्यता आहे. शिवाय येत्या काही दिवसांत कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज आहे.

मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अ‍ॅलर्ट राजी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत चार दिवस ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच पावसाने मुंबईला सकाळपासून झोडपल्याने मुंबईची दाणादाण उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना अ‍ॅलर्ट राहण्याच्या सूचनाही दिल्या.

मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले असून वाहतुकीची कोंडी झाली आहे. वरळी आणि प्रभादेवीतील रस्ते पाण्यात गेले आहेत. हिंदमाता येथे अडीच फुट पाणी साचले आहे. तसेच सायन आणि चुनाभट्टी येथे रेल्वेरुळावर पाणी भरल्याने लोकल ठप्प झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट देऊन मुंबईतील परिस्थितीची पाहणी केली. महापालिकेने मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्याचं कंट्रोल आपत्ती निवारण कक्षात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती निवारण कक्षात येऊन मुंबईतील विविध भागांची पाहणी केली.

पाच मिनिटात झटपट आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दादर टीटी किंवा हिंदमाता येथे पाहणी करण्यासाठी न येता ते थेट पालिकेच्या आपत्ती निवारण कक्षात आले. या कक्षातून त्यांनी अवघ्या पाचच मिनिटात संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला. मानखुर्दमधील नव्या उड्डाण पुलाखाली पाणी भरले होते. त्याची माहितीही त्यांनी यावेळी घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतची माहिती दिली. यावेळी महानगरपालिकेच्या सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) प्रभात रहांगदले, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर हे उपस्थित होते.

कोकण किनारपट्टीला रेड अ‍ॅलर्ट

आज ९ तारखेला कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे. बहुतांशी भागात पाऊस पडत आहे. कोकण किनारपट्टीला आज काही ठिकाणी रेड तर काही ठिकाणी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मुसळधार होणार आहे, असं हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी दिली सांगितलं.

मुंबईत पाच दिवस पावसाचेच

कोकण किनारपट्टीनंतर मुंबईत आज रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढच्या चार दिवसांसाठी मुंबईत ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तरीही पाचही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहितीही शुभांगी भुते यांनी दिली आहे.

पालघरमध्ये रस्ता वाहून गेला

पालघर मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ताच पूर्ण वाहून गेला. कोळगाव येथील पालघर बोईसर रोड वर जिल्हा मुख्यालय समोर असलेला रस्ता पूर्ण वाहून गेला. पालघर बोईसर रोड वाहतूक दोन तासापासून पूर्ण बंद.

सीबीडी बेलापूरचे बस स्टॉप देखील झाले जलमय

काल रात्रीपासून सुरू असलेला पाऊस अद्यापही सुरूच. नवी मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. सीबीडी बेलापूरचे बस स्टॉप देखील झाले जलमय. नवी मुंबईत आतापर्यंत सरासरी मिलिमीटर ८१.५२ मिमी पावसाची नोंद.

कलानगर जंक्शनवर पाणी तुंबले

मुंबईच्या वांद्रे पूर्व इथल्या कलानगर जंक्शनवर पाणी तुंबलं. कलानगर जंक्शन शेजारचा नाला भरून वाहू लागल्याने वांद्रे पूर्व येथे वाहतूक खोळंबलीय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री आहे.

वडाळा परिसररात ७ तासांपासून वाहतूक ठप्प

मुंबईतील पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. वडाळा परिसरात ७ तासांपासून ट्राफिक जाम आहे. वडाळ्यात ७ तासापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू, नागरिक हैराण

कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून पाऊस सुरू आहे. आता पावसाने जोर धरला आहे. कल्याण पूर्वेतील दामोदर नगर परिसरात नागरिकांच्या घरात पाणी साचले होते. आता कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक हैराण आहेत. नक्की महानगरपालिलेने नाला सफाई केली आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाण्यात मुसळधार पाऊस, मुख्य बाजार पेठेत पाणी साचले

ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु असून पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यात ढगाळ वातावरण आहे. चालती वाहने बंद पडल्यामुळे दुचाकी स्वारांची समोर अडचणी निर्माण झाल्या. नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

श्रीवर्धनमध्ये घरावर दरड कोसळली

रायगड येथील श्रीवर्धनमध्ये अतिवृष्टीमुळे घरावर दरड कोसळली, मात्र जिवीतहानी नसली तरी घराचे नुकसान. श्रीवर्धन शहरातील रोहीदास आळीत जयवंत ऐटम याच्या घरावर शेजरच्या डोंगराळ भागातील दोन मोठाल्या दगडी येऊन पडल्या. तात्काळ या ठिकाणी मंडळ अधिकारी, स्थानिक नगरसेवक मदतीला पोहचले, सुदैवाने जिवीतहानी नाही, घरातील सदस्य मात्र सुखरुप. प्रशासनाने रितसर पचंनामा करुन पुढील कारवाई सुरु केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button