Top Newsमनोरंजन

प्रियांकाच्या घरी पाळणा हलला; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्राने शुक्रवारी रात्री एक बातमी शेअर करून तिच्या चाहत्यांना मोठा आनंदायी धक्का दिला. तिने सांगितले की, तिने आणि तिचा पती निक जोन्सने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे. प्रियंका आणि निकचे हे पहिलेच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे. आता प्रियंका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले आहे. आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद, असे प्रियंकाने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button