Top Newsअर्थ-उद्योग

मोदींंच्या काळात स्वीस बँकेत विक्रमी रक्कम जमा; भारतातील काळ्या पैश्याचा मुद्दा ऐरणीवर

नवी दिल्ली : स्वीस बँकेत भारतीयांकडून जमा केल्या जात असलेल्या पैशांमध्ये एका वर्षात २८६ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम जमा केली गेल्यामुळे काळ्या पैशांचा मुद्दा पुन्हा एकदा तापत आहे. २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत भारतीयांनी जो पैसा ठेवला तो २८६ टक्के झाला. तो गेल्या १३ वर्षांतील सर्वांत जास्त रक्कम आहे. किती आहे, कोणकोणत्या खात्यांत, कोणाची आहे याचा माहिती (डाटा) बँकेकडे आहे. त्याचा काही उल्लेख स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालातही आहे.

स्वीस बँकेचे आकडे सांगतात की, स्वीस बँकेची २०१९ मध्ये भारतीयांबद्दल जी लायबिलिटी होती ती एकूण ८९२ दशलक्ष स्वीस फ्रॅकची. ती २०२० मध्ये वाढून २,५५३ दशलक्ष स्वीस फ्रॅक झाली. भारतीय चलनात ही रक्कम जवळपास ७,२०० कोटी रुपयांनी वाढून २०,७०६ कोटी रुपये झाले.

काँग्रेस पक्षाचे नेते रणदीप सूरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “स्वीस बँकेत जमा आता झाले २०,७०० कोटी रुपये. सीआरआय वर्ष २०१९-२०२० दरम्यान त्यात २८६ टक्के वाढ झाली. मोदी जी उत्तर द्या. काळा पैसा परत आणण्याच्या आश्वासनाचे काय झाले? आता तर सात वर्षे झाली. इच्छाशक्ती नाही की पैसा मित्रांचा आहे?”

 

काॅंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी मागणी केली की, मोदी सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी आणि हा पैसा का वाढला? विशेषत: या संकटाच्या दिवसांत. ज्यांचा पैसा वाढला? ते लोक कोण आहेत? पैसा कसा वाढला? हा पैसा आम्ही भारतात परत आणू शकू? याबाबत देशाच्या जनतेसमोर श्वेतपत्रिका जारी केली जावी, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button