उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावे, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठे नाही, अशी राऊतांची इच्छा; फडणवीसांचा टोमणा
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, अशा भावना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या. राऊतांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना टोमणा मारलाय. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं म्हणत फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टोमणा मारताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या.