फोकस

उरण परिसरात आढळला दुर्मिळ उडता ‘सोन सर्प’

उरण : डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छतावर दुर्मिळ उडता सोन सर्प आढळला आहे. उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या दुर्मिळ सापाला पकडून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडून दिले आहे. उडता सोन सर्प (Ornate flying snake ) हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा कोलब्रिड प्रकारातील दुर्मिळ साप आहे. क्रायसोपेलीया वंशाच्या इतर प्रजातींसह, अतिशय असामान्य आहे.

डोंगरी-रोहा येथील अमोल देशमुख यांच्या घराच्या छताखाली असलेल्या गोल पाईपात दुर्मिळ उडता सोन सर्प दिसला. अमोल देशमुख यांनी दूरध्वनीवरुन सपंर्क साधुन उरणच्या वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांना बोलावले. संस्थेचे अध्यक्ष आनंद मढवी, सदस्य विवेक केणी, पंकज घरत, काशिनाथ खारपाटील, मयूर मढवी, राजाराम कडू, बाळा कोळी, रुपेश भोईर, नितीन मढवी, विनीत मढवी, निखिल कोळी, रमेश फोफेरकर, पीयूष लोंगळे, दिलीप मढवी, अजय पाटील,सूचित मढवी, प्रदीप भोनगे, कैलास शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दुर्मिळ सोन सर्पाला मोठ्या शिताफीने पकडले.वनरक्षक तेजस नरे, पी.बी.कराडे, विकास राजपूत यांच्या उपस्थितीत कोंबर डोंगरात सुरक्षितपणे सोडून दिल्याची माहिती आनंद मढवी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button