फोकस

पत्नीच्या पोटगीप्रकरणी हेमंत नगराळे यांना दणका; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. हेमंत नगराळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने न्यायालयात तक्रार दाखल केली होती. चार महिन्याची पोटगीची रक्कम नगराळे यांनी थकवली असल्याची याचिका पत्नीने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यामुळे पत्नीचा कोर्टातला अर्ज रद्द करण्याची मागणी हेमंत नगराळे यांनी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने हेमंत नगराळे यांची मागणी करणारी फेटाळली असल्यामुळे नगराळे यांना दिलासा मिळाला नाही.

२०११ साली हेमंत नगराळे यांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी कुटुंब न्यायालयाने त्यांना दरमहा २० हजार पोटगी मंजूर केली आहे. तसेच या पोटगीमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांच्या पत्नीने केली. हेमंत नगराळे यांच्या पहिल्या पत्नी मुंबई हायकोर्टात देखभाली खर्च वाढून देण्यात यासाठी याचिका केली होती. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. हेमंत नगराळे यांच्या पत्नीच्या याचिकेनुसार प्रति महिना दीड लाख रुपये करण्यात यावा. तसेच, महाराष्ट्रातील पुणे किंवा नागपूर या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी मुंबई हायकोर्टात केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

हेमंत नगराळे यांनी मागील चार महिन्यांची पोटगीची रक्कम थकवली असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. तसेच नगराळे यांच्याकडून असे पहिल्यांदा होत नसल्याचेही त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सांगितले आहे. त्यामुळे पत्नीचा कोर्टातला अर्ज रद्द करण्याची मागणी नगराळे यांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने नगराळे यांची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे मंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना कोर्टाने दणका दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button