फोकस

पाकिस्तानी दहशतवाद्याला दिल्लीतून अटक

नवी दिल्ली : दिल्लीमधील लक्ष्मीनगर येथून पाकिस्तानमधील एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तो राजधानी दिल्ली तसेच काश्मीरमध्ये मोठे हल्ले करण्याच्या तयारीत होता. मिळालेल्या माहितीनुसार तो मागील 15 वर्षांपासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तसेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्नदेखील केले होते. सध्या मात्र तो या महिलेपासून वेगळा राहत होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अशरफ असून तो दिल्ली येथील स्लिपर सेल्सचा प्रमुख होता. भारतात येणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रे तसेच इतर सामान पुरवण्याचे त्याचे काम होते.

दिल्ली पोलिसांनी मोहम्मद अश्रफला अटक केलं आहे. त्याच्या अटकेनंतर पाकच्या कुरापत्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत. अटक करण्यात आलेला अशरफ मागील १५ वर्षांपासून दिल्लीमध्य मौलाना म्हणून राहत होता. तो भारतात अनेक शहरांत यापूर्वी राहिलेला आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपीकडे आयएसआयचे अनेक फोन नंबर मिळालेले आहे. आयएसआयने अशरफला भारतात मोठा हल्ला करण्याची जबाबदारी दिली होती. त्याच्या फोनवरुन जास्तीत जास्त व्हीओआयपी कॉल्स आलेले आहेत. तसेच त्याच्या मोबाईल फोनमधून अनेक पाकिस्तानी मोबाईल नंबर मिळालेले आहेत.

अशरफ राजधानी दिल्ली तसेच काश्मीर खोऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत होता. अशरफच्या संपर्कात अजूनही अनेक लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने कालिंदी कुंज येथील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वाळूमध्ये शस्त्रे लपवून ठेवली होती. अशरफने राजधानी दिल्लीमध्ये लोन वुल्फ अटॅक करण्यासाठी कट रचत होता. अशरफला अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीत जम्मू आणि काश्मीरमध्ये काही ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचण्यात आल्याचे त्याने मान्य केले आहे. असे असले तरी पोलीस या प्रकरणात पुरावे गोळा करण्याच प्रयत्न करत आहेत.

लोन वुल्फ अटॅक म्हणजे काय?

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीने यमुना नदीच्या तिरावर त्याने वेगवेगळी शस्त्रे लपवली होती. मागील काही दिवसांत तो किती आणि कोणत्या लोकांना भेटला आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच अटक केलेला अशरफ लोन वुल्फ अटॅक करण्याच्या तयारीत होता. दहशत माजवण्यासाठी वापरण्यात येणारे हे एक तंत्र आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यात दहशतवादी एकटाच असतो. हल्ला करुन जास्तीत जास्त लोकांजा जीव घेण्याचा प्रयत्न लोन वुल्फ अटॅकमध्ये केला जातो. सध्या अशरफची चौकशी सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button