राजकारण

आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून भाजपचा मंत्री अडचणीत

नोकरीच्या आमिषाने अत्याचार; कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ

बेळगाव : कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी सार्वजनिक झाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बेंगलुरू येथील नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कल्लाहल्ली यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कल्लाहल्ली यांनी सांगितले की मी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत चैाकशी करावी. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सीडीमध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.

संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे.

काँग्रेसची निदर्शने
या आक्षेपार्ह सीडी प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी राज्यातील भाजपा सरकार आणि रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button