राजकारण

राजनाथ सिंह जिंकून आलेत; पंतप्रधानांना फोन करुन मागच्या दाराने मुख्यमंत्री झाले नाहीत : भातखळकर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या विधानावरुन देखील निशाणा साधला. राजनाथ सिंह यांना काही दिवसांपूर्वी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पत्राचा दाखला दिला होता. पण, सावरकर आणि महात्मा गांधी यांची नाव घेण्याची तरी आपली लायकी आहे का? असा विखारी सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये वाद पेटण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.

उद्धव ठाकरेंच्या विधानवरुन भाजपचे नेते आ. अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. भातखळकर ट्विटद्वारे म्हणाले की, सोनिया मतोश्रींचे जोडे उचलणाऱ्यांनी राजनाथ सिंह यांची लायकी काढावी हा किती मोठा विनोद. अहो ते जिंकून आलेत, तुमच्यासारखे पंतप्रधानांना फोन करून मागल्या दराने मुख्यमंत्री थोडेच झालेत, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button