मोफत लसीवरून राहुल गांधींचे केंद्र सरकारवर टीकास्त्र
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे. रुग्णालयात बेड्स नाहीत, ऑक्सिजन नाही अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना प्राणाला मुकावं लागत आहे. तसेच कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्याचबरोबर कोरोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाची लस मोफत मिळाली पाहिजे असं ट्विट त्यांनी केलं आहे.
चर्चा बहुत हो चुकी।
देशवासियों को वैक्सीन मुफ़्त मिलनी चाहिए- बात ख़त्म।
मत बनाओ भारत को भाजपा system का victim!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2021
“चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहिजे. बस एवढंच..भारताला भाजपाच्या सिस्टमचा विक्टिम बनवू नका”, असं टीकास्त्र त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सोडलं आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. सिस्टम फेल झाल्याप्रकरणी जनहिताची चर्चा करणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.