रँडस्टॅड इंडियाचे सीएफओ विश्वनाथ पीएस यांना पदोन्नती
मुंबई : देशाची अग्रगण्य एचआर सेवा पुरवठादार कंपनी रँडस्टॅड इंडिया (Randstad India)ने आपले विद्यमान सीएफओ विश्वनाथ पीएस यांची १ जुलै २०२१ पासून चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टरपदी नियुक्ती झाल्याची घोषणा केली आहे. गेली चार वर्षे रँडस्टॅड इंडियाचे एमडी आणि सीईओ म्हणून कार्यरत पॉल ड्युपुइस यांच्याकडून फायनान्स चीफ आपला नवा पदभार स्वीकारणार आहेत.
विश्वनाथ पीएस (किंवा विशी म्हणून लोकप्रिय असणारे) हे विविध उद्योगक्षेत्रांतील अग्रगण्य कंपन्यांमध्ये दैदिप्यमान कारकिर्द असणारे बिझनेस आणि फायनान्स लीडर आहेत, ज्यांनी सातत्यापूर्ण विकास आणि फायदा यांच्या दृष्टीने काम केले आहे. विश्वनाथ पीएस यांनी २०१४ मध्ये रँडस्टॅड इंडियामध्ये शेअर्ड सर्व्हीस सेंटर (एसएससी)विभागाचे प्रमुख म्हणून आपली कारकिर्द सुरू केली व २०१६ मध्ये त्यांनी कंपनीच्या सीएफओ पदाची जबाबदारी स्वीकारली. विशी यांनी धोरणात्मक आणि रणनितीच्या अशा दोन्ही आघाड्यांवर एक खंबीर नेतृत्व म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. ते एक बहुआयामी, लोकांवर लक्ष केंद्रित करणारे अधिकारी असून कंपनीअंतर्गत विस्तृत पातळीवर उच्च कार्यक्षमतेच्या टीम्स तयार करण्याचा त्यांचा पूर्वेतिहास आहे. विशी यांनी केवळ वित्तीय विभागामध्येच नव्हे तर एकूण रँडस्टॅट कंपनीकडून आपल्या ग्राहकांना दिल्या जाणा-या सेवेच्या क्षेत्रात राबवल्या गेलेल्या अनेक महत्त्वाच्या परिवर्तनशील उपक्रमांवर हुकुमत मिळवली आहे. सातत्यपूर्ण, वाढीस पूरक सुधारणांवर आणि कायझेन कार्यप्रणालीवर त्यांनी सतत लक्ष केंद्रित केल्याने संस्थेच्या उत्पादनशीलतेमध्ये आणि एकूणच कामगिरीमध्ये सुधारणा होत राहिली आहे.
विशी यांनी तीन दशकांहून अधिक काळ अनेक अग्रगण्य जागतिक आणि भारतीय संस्थांमध्ये, विशेषत: या संस्थांच्या धोरणात्मक नियोजन आणि व्यापार विकासाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहून मिळविलेल्या विविधांगी अनुभव आणि नैपुण्याचा लाभ कंपनीस मिळत आहे. रँडस्टॅड इंडियामध्ये येण्यापूर्वी विशी यांनी जनरल इलेक्ट्रिक, मोटोरोला आणि टीव्हीएस ग्रुप अशा कंपन्यांमध्ये उच्चाधिकारी म्हणून काम केले आहे.
या बदलांविषयी बोलताना रँडस्टॅड इंडियाचे चेअरमन आणि रँडस्टॅड ग्लोबलचे ईबी मेंबर ख्रिस ह्यूटिंक म्हणाले, “पॉल हे एक अपवादात्मक बिझनेस लीडर आहेत, ज्यांनी रँडस्टॅड इंडियाचा कायापालट घडवून आणला आहे व या कंपनीला आपल्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी कंपनी बनवले आहे व देशातील काही सर्वाधिक कौतुकपात्र कंपन्यांपैकी एक कंपनी अशी ओळख तिने मिळवली आहे.“
“पॉल यांचे दूरदर्शीत्व, त्यांची धडाडी आणि कामगिरीमधील एकाग्रता व या गुणांना कंपनीच्या दीर्घकालीन हिताशी जपलेल्या कटिबद्धतेची मिळालेली जोड यामुळे रँडस्टॅड इंडियाचे स्थान भक्कम झाले आहे. त्यांनी एक अधिक चपळ आणि लवचिक अशी कंपनी आपल्या हाती सोपवली आहे, जी आजच्या वेगाने बदलणा-या, गतीशील व्यापार क्षेत्रामध्ये चपखल बसणारी आहे. रँडस्टॅड इंडियाला दिलेल्या योगदानासाठी मला त्यांचे व्यक्तिश: तसेच एक्झेक्युटिव्ह बोर्डच्या वतीनेही आभार मानायचे आहेत. रँडस्टॅड जपानचे एमडी या नव्या जबाबदारीसाठी त्यांना अनेक शुभेच्छा.“
या घोषणेबद्दल पॉल ड्युपुइस म्हणाले, “गेली चार वर्षे रँडस्टॅडचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब राहिली आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये मी आमच्या कर्मचा-यांची समर्पित वृत्ती आणि कष्टांसमोर, एका हेतूने पुढे वाटचाल करणारी कंपनी निर्माण करण्याच्या त्यांच्या ध्यासासमोर नतमस्तक झालो आहे. मी त्यांच्याप्रती, तसेच रँडस्टॅडच्या स्टेकहोल्डर्सप्रतीही अत्यंत कृतज्ञ आहे, ज्यांच्या साथीने आम्ही एक दीर्घकाळ चालणारा आणि शाश्वत बिझनेस उभारण्याच्या दिशेने काम केले आहे. इथे शिकलेल्या सर्व गोष्टी रँडस्टॅड जपानमधील आपल्या नव्या भूमिकेमध्ये वापरण्यास मी उत्सुक आहे.“
“मला विशी यांचेही अभिनंदन करायचे आहे. ते एक खंबीर, धोरणी विचारवंत आहेत व मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून वाटचाल करणारे नेते आहे. सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जात्मक कामगिरीचा त्यांचा पूर्वेतिहास अतिशय प्रभावशाली आहे. मी अनेक वर्षे त्यांच्या जवळून संपर्कात आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रँडस्टॅड इंडियाची भविष्यात मोठी भरभराट होईल अशी मला खात्री आहे. त्यांची नेमणूक म्हणजे रँडस्टॅडची आपले उत्तराधिकारी निवडण्याची ताकद आणि कुशल नेतृत्वाची पुढची फळी निर्माण करण्याची क्षमता यांचे द्योतक आहे.” पॉल पुढे म्हणाले.
नव्या आव्हानांबद्दल वाटणारा असणारा आपला उत्साह व्यक्त करताना एमडी आणि सीईओ विश्वनाथ पीएस म्हणाले, “रँडस्टॅड इंडिया सारख्या एका ख-या अर्थी वैश्विक आणि कुशल कर्मचा-यांची रेलचेल असलेल्या ब्रिलियंट ब्रँडचे नेतृत्व करणे ही एक प्रचंड मोठी संधी आहे. आपले ग्राहक आणि कँडीडेट्स यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकत लोकांच्या आयुष्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या कामी कंपनी अनेक प्रकारे योगदान देत आहे आणि गेली सहा वर्षे मी या गोष्टीचा अनुभव घेत आहे. रँडस्टॅड इंडिया आपल्या धोरणाचा भाग म्हणून नवसंकल्पनांच्या सातत्यपूर्ण मांडणीद्वारे नफा मिळवून देणारा विकास साधण्याची प्रक्रिया अधिक गतीमान करणार आहे व हे करताना धोरणांच्या उत्तम अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. आम्ही दीर्घकालीन विकासाचे लक्ष्यही साध्य करत राहणार आहोत व आमच्या स्टेकहोल्डर्ससाठी सर्व मूल्यनिर्मिती करत राहणार आहोत. व्यापारसंधींच्या संकल्पना नव्याने मांडल्या जाण्याच्या या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था प्रवेश करत असताना आपल्या सर्व स्टेकहोल्डर्सना अधिक समृद्ध अनुभव देऊ करणा-या सेवा देण्यास रँडस्टॅड इंडिया सज्ज आहे.“
“इथ मला पॉल यांनी केलेल्या रँडस्टॅडच्या लक्षणीय नेतृत्वाबद्दलही आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि या बदलांच्या प्रक्रियेमध्ये मला त्यांचे मार्गदर्शन सतत मिळत राहील, अशी मला आशा आहे.” विश्वनाथ पुढे म्हणाले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टन्ट्सची पदवीप्राप्त चार्टर्ड अकाउन्टन्ट विश्वनाथ हे सिक्स सिग्माचे प्रमाणित ब्लॅक बेल्ट धारक आहेत. त्यांना व्यायामाची आवड असून धावणे, योगा आणि क्रिकेट हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.