Top Newsराजकारण

बिहारमध्ये दारूबंदी, अन् विधानसभेत सापडल्या बाटल्या; तेजस्वी यादव संतापले

पाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारूबंदी केली आहे. यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून नेली जाणारी दारू पकडली जाते. तसेच गावठी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू होत असतो. दारूबंदीवरून बिहारमधील वातावरण तापलेले असताना आता विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे.

माजी उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या आवारात दारुच्या बाटल्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बाटल्या रिकाम्या आहेत. विधानसभा परिसरात दारुच्या बाटल्या सापडल्याचे वृत्त कळताच तेजस्वी यादव हे पाहणीसाठी पोहोचले. त्यांनी याचा व्हिडीओदेखील ट्विटरवर शेअर केला आहे. ट्विटमध्ये त्यांनी हा प्रकार अद्भुत असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनापासून काही अंतरावर वेगवेगळ्या ब्रँडची दारू उपलब्ध आहे., असे ट्विट त्यांनी केले आहे.

बिहारमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यामुळे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही विधानसभेत दारू आणली जाते, त्याच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. मग बिहारमध्ये काय सुरु असेल त्याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तेजस्वी म्हणाले आहेत. हा एक गंभीर प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. बिहारभर उघडउघड दारू विकली जात आहे. विधानसभेत सापडत आहे, असा मुद्दा तेजस्वी यांनी विधानसभेत उपस्थित केला, यावर अध्यक्षांनी उद्यापासून सुरक्षा वाढविली जाईल असे सांगितले.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दारूबंदीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. राजद आमदार भाई वीरेंद्र आणि भाजपा आमदार संजय सरावगी यांच्यात बाचाबाची झाली. एवढी की दोघेही सभागृहात आहे हे विसरले आणि एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button