Top Newsआरोग्य

वुहानमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; कोविड-१९ सॅम्पलवर आढळले ठसे

मुंबई : कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा केला जातोय. चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये कोरोना विषाणू तयार केलाय. एका नव्या अभ्यासात हा खळबळजनक दावा करण्यात आलाय. चिनी वैज्ञानिकांनी विषाणू तयार केल्यानंतर त्याला रिव्हर्स-इंजीनिअरिंग व्हर्जनमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला. जेणेकरुन हा विषाणू वटवाघळापासून आल्याचं जगाचा समज होईल. मात्र, संपूर्ण जगातील मीडियामध्ये हा विषाणू वुहानच्या लॅबमध्येच निर्माण झाल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनकडून जागतिक आरोग्य संघटनेवर याबाबतच्या तपासासाठी दबाव टाकला जात आहे. डेली मेलने छापलेल्या बातमीनुसार हा अभ्यास ब्रिटिश फ्रोफेसर एंगस डल्गलिश (Angus Dalgleish) आणि नॉर्वेचे वैज्ञानिक डॉ. बिर्गर सोरेनसेन (Dr. Birger Sørensen) यांनी केलाय. या अभ्यासात त्यांनी म्हटलं आहे की, त्यांच्याकडे एक वर्षापासून चीनमध्येच कोविड-१९ विषाणूवर रेट्रो-इंजिनिअरिंग सुरु असल्याचे पुरावे आहेत. मात्र, अनेक वृत्तसंस्थांनी याकडे दुर्लक्ष केलं. प्रोफेसर डल्गलिश हे लंडनमध्ये सेंट जॉर्ज विद्यापीठात कॅन्सर विज्ञानाचे प्राध्यापक आहेक. तर डॉ. सोरेनसेन हे एक व्हायरॉलॉजिस्ट आणि Immunor या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ही कंपनी कोरोनावरील व्हॅक्सिन तयार करत आहे.

दोन वैज्ञानिकांना व्हायरसमधून काय मिळालं?

चीनच्या वुहानमधील लॅबमध्ये जाणिवपूर्वक डाटा नष्ट करण्यात आला. तो लपवण्यात आला किंवा गायब करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या वैज्ञानिकांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांनाही गायब करण्यात आलं. अशावेळी डल्गलिश आणि सोरेनसेन लस बनवण्यासाठी कोरोना सॅम्पलचा अभ्यास करत होते. तेव्हा त्यांनी विषाणूमध्ये एक खास फिंगरप्रिंट शोधून काढला. हा प्रकार लॅबमध्ये व्हायरससोबत काही छेडछाड केल्यासच संभव असल्याचं त्यांचं मत आहे. या दोन्ही अभ्यासकांनी ही बाब जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सायंटिफिक जर्नलनी त्यांचा हा दावा मनावर घेतला नाही.

यापूर्वी २०२० मध्ये अमेरिकेनं कोरोना विषाणू हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याचा वारंवार आरोप केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या या आरोपांना चीनच्या महिला पत्रकारानं दुजोरा दिल्यानं त्या पत्रकाराला चीननं कठोर शिक्षा सुनावली होती. वुहानमधील कोरोना विषाणूबद्दल बातमी देणाऱ्या महिला पत्रकाराला चीनला पाच वर्षांसाठी तुरुंगात डांबल्याचं एका नव्या कागदपत्रांतून उघड झालं होतं. तिच्यावर भांडण्याचा प्रयत्न करणे आणि प्रशासनासमोर अडचणी निर्माण करण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. चीन वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात असे आरोप करतो आणि त्यांना तुरुंगात पाठवतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button