नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देताना काँग्रेसचे वाभाडेच काढले आहेत. त्यांना देशात कोरोना पसरविणारे असा गंभीर आरोप करताना त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून काँग्रेस विविध राज्यांत हरतच असल्याचे म्हटले. नागालँडसारख्या राज्याने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला नाकारले. गोव्यात २८ वर्षांपूर्वी नाकारले. हीच परिस्थिती अन्य राज्यांत सुरु आहे. एवढी वर्षे या राज्यांत पराभव होत असताना देखील काँग्रेसमधील अहंकार काही गेलेला नाही, अशी टीका मोदी यांनी केली.
नागालँडने २४ वर्षांपूर्वी काँग्रेसला निवडले होते, ओडिशामध्ये २७ वर्षांपूर्वी तर गोव्यात काँग्रेस पुर्ण बहुमतात २८ वर्षांपूर्वी काँग्रेसचे सरकार आले होते. त्रिपुरामध्ये १९८८ मध्ये काँग्रेस शेवटची जिंकलेली. पश्चिम बंगालने तर १९७२ मध्ये काँग्रेसला मत दिले होते. तेलंगानाचे राज्य निर्माण करण्याचे श्रेय काँग्रेसने घेतले परंतू जनतेने त्यांना नाकारले, असा लेखाजेखाच मोदी यांनी संसदेत ठेवला.
तुम्ही ज्या पद्धतीची विधानं करताय आणि वागताय, ते पाहता १०० वर्षं सत्तेत यायचं नसल्याचं तुम्ही मनातून पक्कं केलंय असं वाटतं. आता तुम्हीच तयार आहात, तर मीही तयारी करून ठेवलीय, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. थोडी जरी आशा असती किंवा जनता आपल्या परत आणेल अशी जरी आशा असती तर असं केलं नसतं, असंही ते म्हणाले.
Speaking in the Lok Sabha. Watch https://t.co/WfOOasml0G
— Narendra Modi (@narendramodi) February 7, 2022
कोरोना काळानंतरही जग नव्या व्यवस्थेच्या मार्गाकडे जात आहे. भारताला या प्रकरणी मागे राहायचं नाही. भारतानं ही संधी गामावू नये, असं मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.
देशभर कोरोना पसरविण्याचे पाप काँग्रेसचे
कोरोना देशभरात काँग्रेसने पसरविल्याचा गंभीर आरोप मोदींनी केला आहे. पहिल्या कोरोना लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. काँग्रेसवाले ही परिस्थिती कशी बिघडेल याची वाट पाहत होते. जेव्हा डब्ल्यूएचओ सांगत होते की लोकांनी आहे तिथेच थांबावे, जगाला हा संदेश दिला जात होता. परंतू काँग्रेसने तेव्हा हद्द पार केली, महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. दिल्लीतही गाड्यांवर माईक लावून लोकांना त्यांच्या त्यांच्या घरी जाण्यासाठी सांगितले जात होते, असा आरोप मोदी यांनी केला.
कोरोनामुळे परिस्थिती बिघडविण्याची योजना होती. नरेंद्र मोदी कसा सामोरा जाणार, अपयशी होणार असा त्यांचा प्लॅन होता. म्हणून मुंबईच्या स्टेशनवर श्रमिकांची गर्दी जमविण्यात आली. युपी, बिहारच्या लोकांना पाठविण्यात आले. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.
हा देश तुमचा नाहीय का? देशातील लोक, त्यांची सुख-दुःख आपली नाहीत का? कोरोनाचे एवढे मोठे संकट आले, कोणत्या नेत्यांनी मास्क घाला, अंतर ठेवा असे लोकांना सांगितले. जनतेला हे या नेत्यांनी सांगितलं असतं तर भाजपाला किंवा मोदींना काय फायदा होणार होता? पण एवढ्या मोठ्या संकटातही पवित्र काम करायला विसरले, असा आरोप मोदी यांनी केला.
तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही; मोदींनी घेतली काँग्रेसची फिरकी
दरम्यान, काँग्रेस एक क्षणही मोदींशिवाय राहू शकत नाही, असं म्हणत त्यांनी जोरदार टोला लगावला. तुम्ही फाईल्समध्ये अडकून राहिलात, पण आम्ही लोकांचं जीवन बनवलं. सध्या देशात पायाभूत सुविधांची कामंही वेगानं सुरू आहेत. यामुळे देशात रोजगार निर्माण होत आहे. तुम्ही एक क्षणही मोदींशिवाय घालवू शकत नाही. जे इतिहासातून काही बोध घेत नाहीत, ते इतिहासातच हरवून जातात, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा शाधला.
यावेळी मोदींनी स्वच्छ भारत योजनेसह पंतप्रधान आवास योजना यांसारख्या योजनांवरही चर्चा केली. आज गरीब आवास योजनेचा लाभ मिळताच लखपती होतो. गरीबाच्या घरात धुरापासून मुक्ती मिळाली तर हे चांगलंच आहे. आज गरीबाचं बँकेत खातं आहे, बँकेत न जाताही त्यांना आपल्या खात्याचा वापर करता येत असल्याचंही त्यांनी चर्चेदरम्यान सांगितलं.
इन्हे आईना मत दिखाओ, वो आईना भी तोड देंगे; शेरो शायरीतून काँग्रेसवर हल्ला
मोदींनी काँग्रेससोबतच आम आदमी पार्टीवरही जोरदार निशाणा साधला. मोदींनी शेरोशायरीतूनही काँग्रेसवर हल्ला चढवला. ‘वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे’, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्ला चढवला. मुंबईत काँग्रेस नेते यूपी आणि बिहारच्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी जाण्यास सांगत होते. त्यासाठी त्यांना पैसेही देत होते. तुमच्या राज्यात जा आणि कोरोना फैलवा असं सांगत होते, असा गंभीर आरोप मोदींनी केला. त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला अहंकारी संबोधत जोरदार हल्ला चढवला. प्रश्न निवडणुकीच्या निकालाचा नाही. सवाल तुमच्या नैतिकतेचा आहे. इतके वर्ष सत्तेत राहिल्यानंतरही देशातील जनता तुम्हाला का नाकारत आहे? आम्ही एक निवडणूक हरलो तरी एको सिस्टिम काय काय करते. तुम्ही एवढ्या निवडणुका हरल्यानंतरही तुमचा अहंकार जात नाही. अधिर रंजन चौधरी यांनी अनेक शेर ऐकवले. मीही ही संधी घेतो. अहंकाराचीच गोष्ट निघाली आहे. त्यावर मीही तुम्हाला एक शेर ऐकवतो, असं मोदी म्हणाले.
‘वो जब दिन को रात कहे तो तुरंत मान जाओ, नही मानोगे तो वो दिन में नकाब ओढ लेंगे, जरुरत हुई तो हकीकत को थोडा बहोत मरोड लेंगे, वो मगरुर है खुद की समज पर बेइंतहा, इन्हे आईना मत दिखाओ, वो आईने को भी तोड देंगे…,’ असा शेर मोदींनी सादर करून काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला.