मुंबईः उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विविध स्तरावर तयारी सुरू केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी बाराबंकी येथून तीन प्रतिज्ञा यात्रांचा शुभारंभ केला. या यात्रा पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर घेतलेल्या प्रतिज्ञा लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतील.
या यात्रा बाराबंकी ते बुंदेलखंड, शरणपूर ते मथुरा आणि वाराणसी ते रायबरेली – ऑक्टोबर २३ नव्हेंबर १ च्या दरम्यान होतील. वाराणसी ते रायबरेली यात्रा अवधमार्गे जाईल आणि याचं नेतृत्व खासदार प्रमोद तिवारी करतील. बाराबंकी ते बुंदेलखंड मार्गाचं नेतृत्व खासदार पी पुनीया करतील. तर शरणपूर ते मथुरा यात्रा राज्याच्या पश्चिमेकडून जाईल ज्याचे नेतृत्व पूर्व केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद आणि पक्षाचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम करतील.
पक्षेच्या पहिल्या प्रतिज्ञेत ४० टक्के जागा महिला उमेदवारांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या मुलींनी इंटरमिडीएटच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णयही घेतलेला आहे. एकूण सात ठराव मंजूर केले आहेत. बाकीच्या ठरावांमध्ये विद्यार्थिनींना स्कूटी, शेतकरी कर्ज माफी, कोरोना काळातील वीज बील माफी, कोरोना महामारीमुळे आर्थिक फटका बसलेल्या परिवारांना २५,००० रुपये, २० लाख लोकांना नोकरी इत्यादी निर्णय आहेत.
काँग्रेसने एक ट्रेनिंग कॅम्पदेखील सुरू केला आहे. ट्रेनिंग कॅम्प ‘प्रशिक्षण से पराक्रम तक’ या नावाने सुरू केला आहे. जिथे कार्यकर्ते जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर प्रशिक्षण घेतील.