Top Newsस्पोर्ट्स

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतला ऐतिहासिक सुवर्णपदक

टोक्यो : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या प्रमोद भगतनं टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत त्यानं ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलवर २१-१४, २१-१७ असा विजय मिळवला. भारताचे हे बॅडमिंटनमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्यापाठोपाठ मनोज सरकारनं कांस्यपदकाची लढत जिंकून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केलं. भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ४ सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली. दुसरीकडे कृष्णा नागर यानं भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू कृष्णानं पुरुष एकेरी एसएच६ गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टीन कूम्ब्सचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.

पहिल्या गेममध्ये प्रमोदनं ३-६ अशा पिछाडीवरून ८-६ अशी आघाडी घेतली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूला प्रमोदनं चांगलंच दमवलं. त्यानं ही आघाडी ११-८ अशी भक्कम केली. ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूनं कमबॅक करताना ही पिछाडी कमी केली, परंतु प्रमोदनं त्याला डोईजड होऊ दिले नाही. त्यानं पहिला गेम २१-१४ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये डॅनिएलनं ११-४ अशी मोठी आघाडी घेत कमबॅक केले. प्रमोदनं पुढील ९ गुणांपैकी ७ गुण घेत हा गेम ११-१३ असा अटीतटीचा बनवला. प्रमोदनं त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही आणि हा गेम २१-१७ असा जिंकून सुवर्णपदक निश्चित केलं.

कृष्णा नागर यानं भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू कृष्णानं पुरुष एकेरी एसएच६ गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टीन कूम्ब्सचा २१-१०, २१-११ असा सहज पराभव केला.

वर्ल्ड नंबर वन प्रमोद भगत यानं सेमिफायनलमध्ये जपानच्या स्पर्धकाला मात देत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या फुजीहारा याच्यावर २१-११, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केला. सेमीफायनलमध्ये भारताच्या मनोज सरकार याला ग्रेट ब्रिटनच्या स्पर्धकाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. मनोजनं कांस्यपदकाच्या सामन्यात बाजी मारली

बिहार येथील वैशाली गावातला त्याचा जन्म. पाच वर्षांचा असताना त्याच्या डाव्या पायाची वाढ खुंटली. १३ वर्षांचा असताना तो एकदा बॅडमिंटन सामना पाहायला गेला अन् त्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो ओडिसा येथे स्थायिक झाला. पुढील दोन वर्ष त्यानं फिटनेसवर लक्ष केंद्रीत केले. १५ वर्षांचा असताना त्यानं पहिली स्पर्धा खेळली आणि प्रेक्षकांचा पाठींबा पाहून त्याला आणखी प्रेरणा मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button