Top Newsराजकारण

हवामान बदलावर पंतप्रधान मोदींचा पंचामृत फॉर्म्युला !

ग्लासगो: ग्लासगो येथे आयोजित वर्ल्ड लीडर समिट ऑफ कोप-२६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी मोदींनी जागतिक स्तरावरील देशांना आणि नेत्यांना पंचामृत फॉर्मुला दिला असून, लाइफचा एक मंत्रही दिला आहे. या परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी अशा भूमितून आलो आहे, ज्या देशाने हजारो वर्षांपूर्वी दिलेला मंत्रही आजच्या २१ व्या शतकात उपयोगी पडत आहे आणि प्रासंगिक ठरत आहे.

ग्लासगो समिटमध्ये पंतप्रधान यांनी पंचामृत फॉर्मुला दिला. तो म्हणजे २०३० पर्यंत भारत आपल्या नॉन फॉसिल एनर्जी कॅपेसिटी ५०० गीगावॅटपर्यंत कमी करेल. दुसरे म्हणजे भारत सन २०३० पर्यंत ५० टक्के हरित तसेच स्वच्छ एनर्जीपर्यंत वाटा नेईल. तिसरे म्हणजे कुल प्रोजेक्टेड कार्बन एमिशन एक बिलियन टनपर्यंत कमी करेल. चौथे म्हणजे भारत अर्थव्यवस्थेतील कार्बन इंटेन्सिटी ४५ टक्क्यांपर्यंत कमी करेल तसेच २०७० पर्यंत भारत नेट झीरोच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पॅरिस येथे झालेला हवामान बदलाचा करार ही भारतासाठी केवळ एक इव्हेंट नव्हता, तर ती कमिटमेंट होती. भारताने जगाला नाही, तर आपल्या देशवासीयांना हवामान बदलासंदर्भातील वचन दिले आहे. हवामान बदलाचा सर्वांत मोठा फटका शेती आणि शेतकही बांधवांना बसला आहे, असे सांगत विकसनशील देशांना हवामान बदलाचा मोठे नुकसान झाले असून, जागतिक स्तरावरील मागास तसेच प्रगतीत मागे असलेल्या देशांना बड्या देशांकडून मदत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय लाइफ म्हणजे लाइफ फॉर इनव्हायरमेंट असा मंत्र या परिषदेच्या माध्यमातून जगाला दिला.

हवामान बदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत संपूर्ण जगासमोर भारताची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी हवानबदलाची ही समस्या गंभीर असून सन २०७० पर्यंत भारतातील कार्बनचे उत्सर्जन शून्यावर आणले जाईल असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताच्या या भूमिकेचे जगभरात स्वागत होत आहे. तसेच मी आज येथे आलो आहे तर आज भारत देशाचे ट्रॅकरेकॉर्ड सांगतो. भारत आज रिन्यूएबल एनर्जी निर्मितीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. जगातील पूर्ण लोकसंख्येच्या अर्धे लोक भारतात वर्षभरात फक्त रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेने सन २०३० पर्यंत उत्सर्जनाच्या बाबतीत नेट झिरोवर येण्याचे लक्ष्य समोर ठेले आहे, असेही आश्वसन मोदी यांनी जगाला दिले.

भारत २०३० पर्यंत गैर-जीवाश्म ऊर्जेच्या क्षमतेला ५०० गीगावॅटपर्यंत पोहोचवेल. २०३० पर्यंत भारत आपल्या उर्जासंबंधीच्या ५० टक्के गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण करेल. भारत २०३०2030 पर्यंत एकूण अंदाजित कार्बन उत्सर्जन एक अब्ज टनांनी कमी करेल.

भारतात राबवण्यात आलेल्या अनेकविध योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब आणि गरजू समाजाला मोठे लाभ मिळवून दिले. यामध्ये जल, स्वच्छ भारत मिशन आणि उज्ज्वला यांसारख्या अनेक योजनांमुळे कोट्यवधी देशवासीयांना मोठा लाभ मिळाला. इतकेच नव्हे तर समाजाभिमुख आणि अनुकूल योजना, धोरणांमुळे गरीब समाजाचा जीवनस्तरही सुधारला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button