
नवी दिल्ली: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाची लस घ्या आणि बाहुबली बना, असं आवाहन देशवासियांना करतानाच संसदेत कळीचे प्रश्न विचारा. पण उत्तरं देण्याची सरकारला संधीही द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना केलं.
कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्यासाठी सभागृहात सहकार्य करा. आपण बाहुवर व्हॅक्सिन घेतली आहे. बाहुवर व्हॅक्सिन घेतल्याने तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बाहुबली बनण्याचा हा एकमेव उपाय आहे. बाहुवर लस घेणं हाच पर्याय आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
I would like to urge all the MPs & all the parties to ask the most difficult & sharpest questions in the Houses but should also allow the Govt to respond, in a disciplined environment. This will boost the democracy, strengthen people's trust & improve pace of development: PM Modi pic.twitter.com/eG6FoqTcl8
— ANI (@ANI) July 19, 2021
आतापर्यंत ४० कोटीहून अधिक लोक कोरोना विरोधात बाहुबली बनले आहेत. संपूर्ण जगाला या महामारीने घेरलं आहे. मानव जातीला घेरलं आहे. त्यामुळे संसदेत या संदर्भात चर्चा व्हावी. प्राधान्याने त्यावर चर्चा व्हावी. व्यवहारी सूचना याव्यात. त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी नव्याने उभं राहता येईल. काही चुका असतील तर त्या दुरुस्त करता येईल, असं आवाहनही त्यांनी केलं.
I have urged all Floor Leaders that if they can take out some time tomorrow evening then I would like to give them all detailed information regarding the pandemic. We want discussion inside the Parliament as well with the Floor Leaders outside the Parliament: PM Modi#COVID19 pic.twitter.com/rJ5tul3j9c
— ANI (@ANI) July 19, 2021
सभागृहाचं कामकाज परिणामकारक झालं पाहिजे. सार्थक चर्चा झाली पाहिजे. देशातील लोकांना जी उत्तरं हवी आहेत. सरकार त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा. पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे. तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी. कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजेत, असंही मोदी म्हणाले.




