ब्रिटीश पंतप्रधानांशी शारीरिक संबंध; पूर्वीच्या गर्लफ्रेंडचा गौप्यस्फोट
ब्रिटनमध्ये वादळ, नाजूक प्रकरणाची चौकशी सुरू

लंडन: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या एका भलत्याच वादात अडकले आहेत. त्यांची पूर्वीची गर्लफ्रेंड आणि उद्योजिका जेनिफर अर्करी हिने जॉन्सन यांच्याबाबतचा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान जॉन्सन यांच्यासोबत आपले शारीरिक संबंध होते, असं जेनिफरने म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर तिने त्यांच्या दोघांचा एक सेक्सी फोटोही शेअर केला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये वादळ उठलं असून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. जॉन्सन यांच्या सोबतचं प्रेमप्रकरण चार वर्षे सुरू होतं, असंही तिने म्हटलं आहे.
जेनिफर ही जॉन्सन यांच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. त्याकाळात पंतप्रधानांची पत्नी मरिना घरी नसताना आमचे संबंध आले होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये एकत्र शय्यासोबत करायचो. या फ्लॅटमध्ये पोल डान्सरसाठी पोलही बनवलेला होता. जेव्हा आम्ही प्रेमात आकंठ बुडालेलो होतो, तेव्हा आठवड्यातून एकदा तरी भेटायचोच, असं जेनिफरने सांगितलं. बोरिस जॉन्सन यांना मी माझा टॉपलेस फोटोही पाठवला होता, असं सांगतानाच मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. ते मला खूप आवडतात, असंही तिने सांगितलं.
आम्हा दोघांमध्ये शारीरिक आणि बौद्धिक आकर्षण होते. बोरिस माझं शरीर आणि बुद्धी दोन्हीवर प्रेम करायचे. त्यावेळी ते लंडनचे मेयर होते. आणि आमचं प्रेमप्रकरण 2012 ते 2016 पर्यंत सुरू होतं, असं तिने सांगितलं. जेनिफर आणि जॉन्सन जेव्हा करदात्यांच्या पैशांनी ट्रेड मिशनवर गेले होते तेव्हा या दोघांच्या नातेसंबंधावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले गेले. त्यांच्या या दौऱ्यावरून या दोघांमध्ये नातेसंबंध होते हे उघड झाले आहे. मात्र, या दोघांनी त्याबाबत कबुली देण्यात आली नव्हती.
2016 मध्ये मी जॉन्सन यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते. मात्र, तसंच प्रेम आता राहिलं नाही, असंही तिने सांगितलं. तसेच त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्साही तिने सांगितला. एका रेस्टॉरंटमध्ये जॉन्सन दारू प्यायले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत डेटिंग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा त्यांच्या फ्लॅटवर संबंध ठेवले होते, असंही तिने स्पष्ट केलं.