परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये त्यांनी पत्रात गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आपली याचिका दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची याचिका परमबीर सिंग यांनी हायकोर्टात मागणी केली आहे.
दरम्यान, परमबीर सिंसिंग यांनी या याचिकेत असे म्हटले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, यासह मुंबई पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर ठरविण्यात यावी आणि या प्रकरणी होणाऱ्या पुढील कारवायांपासून संरक्षण देण्यात यावे, अशा मागण्या परमबीर सिंह यांनी आपल्या दाखल केलेल्या याचिकेत केल्या आहेत.
माझ्यावर झालेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गृहमंत्र्यांनी २१ मार्चला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, तर ते चार दिवस गप्प का राहिले? असा प्रश्न विचारणारं २४ मार्चला मध्यरात्री १२ वाजून १८ मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्याचं ‘दूध का दूध और पानी का पानी’ व्हावं यासाठी चौकशी समिती नेमण्यात यावी, असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.