राजकारण
अजितदादांनी बारामतीत ३.४०८ चौरस मीटर जमीन बळकावली; मुंबई हायकोर्टात याचिका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. बारामती शहरात जवळपास ३ हजार ४०८ चौरस मीटर जमीन अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आलंय. निर्धारित नियमांचं पालन न करता अजित पवार यांच्यावर सदर जमीन ही ९९ वर्षाच्या लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप अजितदादांवर करण्यात आलाय. ही जमीन गतीमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित आहे. मात्र, त्या जमिनीवर थिएटर बनवण्याचा घाट घातला जात असल्याचं कळतंय. या प्रकरणात लवकरच मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे.