मुक्तपीठ

पवार यांची कानटोचणी

काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीराष्ट्रवादी काँग्रेसवर कायम टीका करायची आणि स्वबळाचा नारा द्यायचा, तरीही राष्ट्रवादीकाँग्रेसने मात्र त्यावर काहीच भाष्य करायचे नाही, असे काही ठरलेले नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते काँग्रेसवर फारशी टीका कधीच करीत नसले, तरीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र मधूनच असा एखादा झटका देतात, कीत्यावर सर्वांची बोलती बंद होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पवारयांना थातुरमातुर उत्तर देतात; परंतु पवारयांच्या उंचीएवढी त्यांची राजकीय उंची नसल्याने त्यांना कुणी गांभीर्याने घेतनाही. पवार यांनी दिलेली उदाहरणे आणि त्यांची टीका खोडून काढता येत नसल्याने अन्यमार्गांनी दिलेले प्रत्युत्तर तेवढे दखलपात्र ठरत नाही. पवार यांच्या टीकेला राहुलगांधी किंवा सोनिया गांधी यांनी उत्तर दिले, तर त्यात गांभीर्य असेल. काँग्रेसनेत्याची दखल घेतली असे म्हणता येईल. पवार, ममता बॅनर्जीसह काँग्रेसमधून काहीतात्विक कारणांनी बाहेर पडलेल्या नेत्यांची अजूनही नाळ काँग्रेसच्या विचारांशीजुळलेली आहे. काँग्रेसचे नुकसान होण्यात या राजकीय पक्षांचेही नुकसान असते. काँग्रेसमधीलअंतर्गत गटबाजी, पराकोटीचे मतभेद यामुळे या पक्षाची देशातील अनेक राज्यांतील सत्तागेली. लोकसभेच्या दोन निवडणुकांत काँग्रेसच्या जागांची संख्या पन्नासच्या आतराहिली. त्याचा परिणाम काँग्रेसच्या विचारांच्या या पक्षांना सत्तेतून दूर जावेलागले. बॅनर्जी या तरी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्या होत्या. पवार यांचे तसेहीनाही. त्यामुळे भाजपविरोधकांची आघाडी काँग्रेस वगळून होऊ शकत नाही, असे ते ठासूनसांगतात. ही परिस्थिती एकदा का लक्षात घेतली, की पवार मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवरका टीका करतात, हे समजून घेतले पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारएकाच विचारसरणीचे आहेत. त्यामुळे काँग्रेसची मतपेढी कमी करून राष्ट्रवादी काँग्रेसचाफारसा फायदा होणार नाही, हे न समजण्याइतके पवार मुळीच दुधखुळे नाहीत. स्वबळाचीभाषा वापरणा-या आणि पवार, अजितदादा यांच्यावर कायम टीका करणा-या पटोले यांच्यासहकाही नेत्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पवार यांनी एकहाती निवडणुकीचा किल्ला लढविलानसता, तर दोन आकडी जागा तरी मिळविता आल्या असत्या, का याचे आत्मपरीक्षण करणेआवश्यक आहे. काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातयांच्यासारखे काही नेते काम आणि त्यांच्या संयमीपणामुळे टिकून आहेत. पवार यांच्यांशीचांगले संबंध ठेवूनही काँग्रेसमध्ये राहता येते. यश मिळविता येते, हे त्यांनी अनेकदादाखवून दिले आहे. अन्य नेत्यांच्या निष्ठा तसापाव्या लागतील, इतक्या पातळ आहेत.ज्यांना मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद दिले, त्यांनी भाजपची वाट धरली, ही उदाहरणेकाँग्रेसमध्ये आहेत. त्यांचा कडवा पवार विरोध काँग्रेसच्या किती कामी आला, याचाहीशोध घेण्याची आवश्यकता आहे. सच्चा मित्र कधीचखूशमस्करी करण्याच्या भानगडीत पडत नाही. मित्र चुकत असेल, तर त्याला दोन गोष्टीपरखडपणे सांगाव्या लागतात. प्रसंगी कानउघाडणी करावी लागते. सुधारण्यासाठी दिलेलासल्ला मानून तसे आचरण केले, तर त्यात फायदाच असतो; परंतु काँग्रेसच्या नेत्यांना मिरच्या झोंबतात. टीका केली किंवा नाहीकेली, तरी पवार यांचे काही बिघडणारे नसते. त्यांच्या पक्षाचे त्यामुळे ना नुकसानहोणार, ना फायदा. गेल्या तीन दशकांत काँग्रेसमधून मासबेस असलेले नेते का सोडूनजातात, याचा काँग्रेसने कधीच विचार केला नाही. उलट, ज्या नेत्यांमागे जनमत आहे,त्यांना काँग्रेसने डावलले. आताही तेच सुरू आहे. निवडणूक एकाने जिंकून द्यायची आणिदरबारी राजकारण करणारे मात्र खुर्ची पटकावणार हेच चित्र वारंवार दिसायला लागले.त्यामुळे काँग्रेसची पडक्या हवेलीसारखी अवस्था झाली आहे. शिवाय पवार यांच्या आताच्याविधानामुळे जी टीका होते आहे, ते विधान कोणत्या परिस्थितीत केले आहे, ते समजूनघेण्याची आवश्यकता आहे. पवार यांना काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत विचारण्यातआलेल्या प्रश्नावरचे ते उत्तर होते. ‘काँग्रेसची स्थिती ही जमीन न उरलेल्या जमीनदारासारखी झाली आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी काँग्रेसचे वर्णन केले. काँग्रेसची सध्याची स्थिती तशी नसेल, तर त्यावर टीकाकारांनीअवश्य भाष्य करायला हवे. पवार गेल्या दोन वर्षांपासून भाजपविरोधी आघाडी बांधण्याचाप्रयत्न करीत असताना काँग्रेसने त्यावर सकारात्मक भूमिका घेतली नाही. उलट, अनेकदात्यात खो घातला. आता मात्र सोनिया गांधी यांना त्याची जाणीव झालेली दिसते. त्यामुळेतर त्यांनी ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांशी संपर्क करायलासुरुवात केली आहे. दरबारी राजकारणातून काँग्रेस सावरली नाही, तर काय होते, हे तिलापंजाबमध्ये आणखी सहा-सात महिन्यांनी होणा-या निवडणुकीत दिसेल. त्यासाठी पवार यांचीटीका नक्कीच जबाबदार नाही, हे काँग्रेसमधील पटोले यांच्यासह अन्य पवारविरोधी नेत्यांनीलक्षात घ्यायला हवे. पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसला रामराम करून आपली वेगळी चूल मांडली.त्यामुळे काँग्रेसबद्दलची आणि गांधी घराण्याबद्दलची त्यांच्या मनातली अढीसगळ्यांनाच ठावूक आहे. पवार यांचे सरकार पाडणे,जादा जागा निवडून आणूनही त्यांना पंतप्रधानपदावर विराजमान होता येणार नाही, अशीव्यवस्था करणे यामुळे पवार यांच्या मनात जरी कटुता असली, तरी नंतर त्यांनीकाँग्रेसशी जुळवून घेतले आहे. ते थेट भाजपच्या वळचणीला गेलेले नाहीत. भाजप आणि नरेंद्र मोदींनाविरोध करायचा असेल, तरसगळ्या प्रमुख आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे, ही भूमिका घेणारेही पवार हेच आहेत. काँग्रेसकडे 20 टक्के म्हणजे जवळपास साडेबारा कोटी जनतेची मते आहेत, म्हणूनच पवार यांनी गेल्या जून महिन्यात काँग्रेसने भाजपविरोधी आघाडीत सामीलव्हावे असे सुचवले होते. काँग्रेस पक्ष निर्नायकी अवस्थेत असणे पवार यांनाही दु:खदायक आहे. पवार यांच्यासारख्या नेत्यांनाकाँग्रेसने मोठ्या मनाने आपल्या राजकीय अस्तित्वाचा स्वीकार करावा असे वाटते. काँग्रेसने बदलावे असे ते या ना त्या मार्गाने सुचवत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातसलग 15 वर्षे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याचे,त्यांच्या ताब्यातील संस्थांची अडवणूक करण्याचे आणि विरोधकांना माहिती पुरवण्याचेकाम तसेच पवार यांच्यावर विरोधक जेवढी टीका करतात, त्याहून अधिक टीका करण्याचे कामकोण करीत होते, याच्या खोलात गेले, तर पवार यांच्या काँग्रेसवरील टीकेचा अर्थकळतो. राष्ट्रवादीच्याआमदारांना सरकारच्या बैठकीत काँग्रेसकडून चांगली वागणूक मिळत नाही, अशी तक्रार नेहमी ऐकायला मिळत होती, म्हणूनच काँग्रेसने आपली सरंजामशाही वागणूक सोडावीहेच पवार यांना सुचवायचे असावे. काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राहुल गांधी यांनाअध्यक्षपदी बसवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युवा काँग्रेसच्या अलीकडेचकाश्मीरमधल्या राष्ट्रीय परिषदेत राहुल यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असा ठराव संमत केला आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास ममताआणि पवार यांच्यासारखे नेते तयार नाहीत, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच पवार यांनी काँग्रेसवरअशी टीका केली आहे. काँग्रेसमध्ये आणि देशातही एक गट असा आहे ज्यांना वाटते, की काँग्रेसने जुने विचार सोडून राजकारणाकडे नव्यादृष्टिकोनातून पाहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button