पटोलेंच्या नेतृत्वात उद्या काँग्रेसची राजभवनावर धडक; मौनव्रत आंदोलन
मुंबई : लखीमपूर खेरी हिंसाचार आणि शेतकरी मृत्यू प्रकरणात देशभरातून केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलाय. आशिष मिश्रा यांचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे. या मागणीला घेऊन नाना पटोले यांच्या नेतृत्वात सोमवारी राजभवनावर मौनव्रत आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाविषयी आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. आशिष मिश्राच्या वडिलांनी राजिनामा घ्यावा. त्यासाठी आम्ही उद्या (११ ऑक्टोबर) राजभवनासमोर आंदोलन करणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
आमच्या नेत्यांनी पूर्ण देशभर विरोध केला आणि दबाव वाढवला. आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी प्रयत्न केला जातोय. आशिष मिश्राच्या वडिलांचा राजीनामा घ्यावा. उद्या आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले आहेत.