फोकस
गोवंडीत इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, ७ जण जखमी
मुंबई – मुंबईतील गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सात जण जखमीही झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे पाच वाजता तळमजला अधिक एक मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आणखी सात जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.