Top Newsअर्थ-उद्योगराजकारण

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार; १ फेब्रुवारीला ‘बजेट’ !

नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संसंदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रात पार पडणार आहे. ३१ जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन १२ मार्चला सुरु होणार आहे. तर, ८ एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होईल. या दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करतील, अशी माहिती आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ससंदेतील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. संसदेतील जवळपास ४०० कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेची पाहणी केली होती. नरेंद्र मोदी सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार का हे पाहावं लागणार आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी पार्लमेंट हाऊसची पाहणी केली होती. संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेताल होता. ओम बिर्ला यांनी त्यावेळी ६० वर्षांपेक्षा जादा वय असणाऱ्या खासदारांची विशेष दक्षता घेण्यात यावी. त्या दृष्टीनं कोविड प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा देखील त्यांनी घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. संसदेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळून आले होते, हे वास्तव आहे. मात्र, सध्या सर्व अधिकारी कर्मचारी व्यवस्थित असून त्यांच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येत असून डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेऊन आहेत, असं ओम बिर्ला म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button