राजकारण

परमबीर सिंगांच्या आरोपांत तथ्य नाही, अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत : शरद पवार

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्बद्वारे गंभीर आरोप केले आहेत. यात त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना बंगल्यावर बोलवून पैसे गोळा करण्यासंबंधीत माहिती दिल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी निर्माण करण्यात महत्त्वाचा वाटा असणारे शरद पवार यांनी या आरोपाचे खंडन केलं आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची माहिती चुकीची आहे. अनिल देशमुख ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत रुग्णालयात होते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. यावरुन परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं शरद पवार म्हणाले.

परमबीर सिंगांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत त्यानुसार 5 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. नागपूरमधील रुग्णालयाकडून काही कागदपत्र मिळवली आहेत, त्या रुग्णालयाने सर्टिफिकेट दिलं आहे. अनिल देशमुख हे 17 दिवस भरती होते. आज हातात आल्याल्या माहितीवरून देशमुखांविरोधात केलेल्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार म्हणाले, 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत देशमुख कोरोनाबाधित असल्यामुळे रुग्णालयात भरती होते. रुग्णालयातील कागदपत्रावरुन देखील देशमुख हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना 15 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर 15 दिवसांचा होमक्वारंटाईन सांगितलं. देशमुख हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे. 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरन्टाईनचा सल्ला डॉक्टरांचा होता. त्यामुळे या दरम्यान अनिल देशमुख होम कॉरेन्टाईन होते. त्यामुळे केलेले आरोप हे तथ्यहीन होते. महाराष्ट्र एटीएस योग्य दिशेने तपास करत आहे, त्यांचा तपास विचलीत करण्यासाठी असे आरोप होत आहेत
फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असा जर परमबीर सिंग यांचा आरोप आहे. तर मग आरोप करण्यासाठी परमबीर एक महिना का थांबले असा सवाल देखील शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परमबीर यांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग दिलं होतं.

हिरेन मृत्यूप्रकरणाचा यशस्वीपणे छडा
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (ATS) हिरेन मृत्यूप्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावला. मात्र, या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांकडून परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरण्यात आला, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. ATS च्या तपासाची दिशा अचूक असल्याचा मला आनंद आहे. एटीएसने दोघांना अटक केली. मुख्य केस आहे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं आणि हिरेन हत्या ही होती. मात्र, त्यावरुन लक्ष भरकटवून विरोधकांनी परमबीर सिंग यांच्या पत्राचा मुद्दा उचलून धरला. ते चुकीचं आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button