राजकारण

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 17 एप्रिल रोजी मतदान, तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्याने पंढरपूर तालुक्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी 6।महिन्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. त्यानुसार आज निवडणूक अयोगाने पंढरपूर ची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 23 मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारभ होणार आहे. 30 एप्रिल अर्ज भरण्याची शेवटची तारीख तर 3 एप्रिल पर्यत अर्ज मागे घेता येणार आहे. प्रत्यक्ष मतदान 17 एप्रिल तर मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. दरम्यान, विधानसभा पोटनिवडणूकिसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै. आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर असून विरोधात कोण उमेदवार असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button