आरोग्यफोकस

पाकिस्तानकडून भारतासह २६ देशांच्या विमान प्रवासावर बंदी

कराची : वाढत्या कोरोना महामारीमुळे पाकिस्तानने हवाई प्रवासाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतासह २६ देशांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरने या सर्व २६ देशांना सी कॅटगरीमध्ये समाविष्ट केले आहे. आपल्या देशात कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानमधील ए कॅटेगरी प्रवाशांना कोविड -१९ मधून सूट देण्यात आली आहे. तर बी कॅटेगरीतील प्रवाशांसाठी अँटी पीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. प्रत्येक प्रवाशाला प्रवासाच्या ७२ तास आधी टेस्ट रिपोर्ट आणावा लागणार आहे. तर, जे प्रवासी किंवा देश सी कॅटेगरीमध्ये असतील त्यांना संपूर्ण प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कॅटेगरीसाठी एनसीओसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार अंतर्गत प्रवास करण्यास सूट मिळणार आहे.

या देशांवर पाकने लादले निर्बंध

भारत, इराण, बांगलादेश, भूतान, इंडोनेशिया, इराक, मालदीव, नेपाळ, श्रीलंका, फिलिपिन्स, अर्जेंटिना, ब्राझील, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, बोलिव्हिया, चिली, कोलंबिया, कोस्टा रिका, डोमिनिका, इक्वाडोर, नामीबिया, पराग्वा, पेरू , त्रिनिदाद, तंबाखू, उरुग्वे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button