Top Newsराजकारण

मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित होते. मानेच्या आणि पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मुख्यमंत्री रुग्णालयातच पोस्ट सर्जरी उपचार घेत आहेत. आठवड्याभरापासून मुख्यमंत्र्यांवर उपचार सुरु आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थिती लावल्यावर आपली तब्येत ठीक असल्याची माहिती दिली आहे. राज्यातील १ ली ते ४थीच्या शाळा सुरु करण्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना संदर्भात आणि पीक पाणी परिस्थिती, लसीकरण अशा विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि पीक पाणी पिरस्थिती अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत माहिती दिली आहे. राज्यात कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button