राजकारण

भाजपमध्ये येण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर; ‘आप’ खासदाराचा आरोप

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या एका मोठ्या नेत्याने भाजपत प्रवेश करण्यासाठी पैसे आणि कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप भगवंत मान यांनी केला आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया देत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे. तसेच भगवंत मान आपमधील त्यांचं महत्त्व वाढवण्यासाठी असा दावा करत असल्याचा आरोप केला.

पंजाबमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भगवंत मान यांनी, मला भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला. त्यांनी भाजपत येण्यासाठी तुम्ही काय घ्याल? असा प्रश्न विचारला. तुम्हाला किती पैसे हवेत ते सांगा. तुम्ही खासदार आहात आणि एकमेव खासदार आहात त्यामुळे तुमच्यावर पक्षांतर्गत बंदीचा कायदा लागू होणार नाही. तुम्ही भाजपात या. तुम्हाला आम्ही कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असं म्हटलं आहे.

मी भाजपच्या नेत्यांना सांगितलं की मी एका मोहिमेवर आहे, कमिशनवर नाही. मी भरपूर पैसा देणाऱ्या करियरच्या सर्वोच्च स्थानी असताना ते सोडून पंजाबच्या हक्कासाठी राजकारणात आलो आहे. आतापर्यंत घाम आणि रक्त आटवून आप पक्ष निर्माण केला आहे. पंजाबच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे, असं देखील भगवंत मान यांनी म्हटलं. ऑफर देणाऱ्या नेत्याचं नाव सार्वजनिक करावं असं जाहीर आव्हान हे भाजपकडून मान यांनी देण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button