राजकारण

आताचे दिल्लीतील सत्ताधारी तेव्हा इंग्रजांचे पाय चाटत होते; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लबोल केला आहे. वडेट्टीवार यांनी कंगना रनौत हिच्यासोबत भाजपवर जोरदार घणाघात केला. काँग्रेस स्वातंत्र्यासाठी लढत असताना आताचे दिल्लीतील सत्ताधारी इंग्रजांशी हातमिळवणी करुन त्यांचे पाय चाटत होते, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

देशभक्त आहात कारण तुम्ही काँग्रेस विचाराचे आहात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस लढत होती तेव्हा सत्तेमध्ये जे आहेत दिल्लीच्या ते इंग्रजांबरोबर हातमिळवणी करुन त्यांचे पाय चाटत होते, असा घणाघात करत वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या विचारांचा व्यक्ती देशभक्त आहेत. काँग्रेसच्या विचारांच्या लोकं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

कंगना रनौतने एका मुलाखतीत स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. कंगना एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाली, स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलयाचं झाल्यास या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button