राजकारण

शिवसेनेतील बाटग्यांची यादी मोठी; नितेश राणेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : वेळ आली तर सेनाभवन फोडू या भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या विधानानंतर शिवसेना-भाजपा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते भाजपावर शरसंधान साधत आहेत तर भाजपातील नेतेही आक्रमकपणे शिवसेनेला प्रत्युत्तर देताना दिसून येत आहेत. यातच आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेने केलेल्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे.

भाजपा आमदार नितेश राणेंनी ट्विट करून म्हटलंय की, मराठी माणसाची संघटना म्हणे मग बेस्टच्या जागा – कनकिया, बीएमसी कॉन्ट्रॅक्ट – दिनो मोरिया, रात्रीच्या पार्ट्या – पटानी, कपूर आणि जॅकलीन… मग यात इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत? मराठी माणूस दिसत नाही? असा सवाल राणेंनी उपस्थित करत डाके, रावते, रामदास कदम, विजय शिवतारे, राजन साळवी, सुनील शिंदे सारखे जुने शिवसैनिक दिसणार नाहीत. स्वतः पवारांची लोम्बते होऊन चमकायचे आणि दुसऱ्यांना मोठी मोठी भाषण द्यायची असा टोला शिवसेना नेते संजय राऊतांना हाणला आहे.

तसेच शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे. पण थोडी माहितीसाठी अशी की सचिन अहिर, राहुल कनाल, आदेश बांदेकर, उदय सामंत, अब्दुल सत्तार, प्रियांका चतुर्वेदी, ही यादी मोठी आहे. इथे कुठेही शाखाप्रमुख, शिवसैनिक दिसत नाही असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे. तर नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय ? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना आहे. बाळासाहेब यांची सेना आहे कुठे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सत्ता हा शिवसेनेचा आत्मा कधीच नव्हता आणि बाटग्यांच्या बळावर महाराष्ट्राच्या अस्मितेच्या लढाया आम्ही कधीच लढल्या नाहीत. आजच्या भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जन्माचे डोहाळे लागण्याआधी अनेक वर्षांपासून गरम रक्ताच्या पिढीवर शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात वाघाच्या काळजाने राजकारण करीत आहे. जी शिवसेना घरभेद्यांच्या निषेधाच्या आरोळय़ांनी गडबडली नाही, दिलेल्या शब्दास न जागणाऱ्या भाजपच्या फसवेगिरीने नाउमेद झाली नाही. उलट आज ती महाराष्ट्राची सत्ताधारी झाली असा टोलाही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावला आहे.

त्याचसोबत भारतीय जनता पक्ष हा कधीकाळी निष्ठावंत, जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढी या पक्षात होती. उपऱ्यांना, बा%

Related Articles

Back to top button