राजकारण

आ. नितेश राणेंना जामीन मिळणार का?; उद्या सुनावणी

सिंधुदुर्गः शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आ. नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू असून, नितेश राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. उद्या दुपारी २.४५ वाजता या प्रकरणात सुनावणी होणार आहे. त्यावेळी सरकारही वकील आपला युक्तिवाद न्यायालयासमोर करणार आहेत.

विशेष म्हणजे आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकिलांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. त्यावेळी त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. सरकारी वकील म्हणाले की, सरकारी वकील अटकपूर्व जामिनावर पहिल्यांदा जो युक्तिवाद करायचा आहे, तो अर्जदाराच्या वकिलांनी करायचा आहे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केला. तो आम्ही काळजीपूर्वक ऐकला. त्यांना काय म्हणायचं समजून घेऊन त्यांनी जो जो मुद्दा उपस्थित केलाय, त्याला उत्तर देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. तर आमचा युक्तिवाद आज पूर्ण झालेला नाही. उद्या आमचा युक्तिवाद सुरू राहील. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतरच या विषयावर आम्हाला बोलता येईल. गुन्ह्याची न्यायालयासमोर सुनावणी आहे. गुन्ह्यात आरोपींचा सहभाग आहे का यावर वकिलांनी बोललं पाहिजे. त्याऐवजी त्यांनी विधानसभेत काय झालं. कुठल्या मंत्र्यांनी कोणाचा सत्कार केला हे सांगितलं, असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय.

गुन्ह्यांचं रिपोर्टिंग करणं पत्रकारांचं काम आहे, आमचा राजकारणाशी संबंध नाही. राजकारणी गुन्हेगाराच्या घरी जाऊन सांत्वन करतात, त्याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. न्यायालयासमोर पोलिसांचा तपास ठेवू आणि त्यांच्या अर्जाला आम्ही विरोध करू. आम्ही त्यांच्या युक्तिवादाला अजून उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे मी आता बोलू शकत नाही. उद्या जेव्हा वेळी तेव्हा आम्ही त्याच्यावर बोलू. न्याय देणारं आणि त्यांच्या समोर येणाऱ्या गोष्टींवर विचार करणारं न्यायालय आहे. आरोपीच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्जाची मागणी न्यायालयानं नाकारलेली आहे, असंही सरकारी वकिलांनी सांगितलंय.

पहिला मुद्दा म्हणजे गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी आहे. गुन्ह्यात आरोपी आहे की नाही यावर वकिलाने बोललं पाहिजे. पण त्यांनी विधानसभेत काय झालं? कोणी कुणाचा सत्कार केला हे सांगितलं. गुन्हे घडतात त्याचा तपास करणं हे पत्रकाराचं काम आहे हे आम्ही सांगितलं. न्यायालयासमोर पोलिसांसमोर ठेवून त्यावर युक्तिवाद करू. आम्हाला बाकीच्या गोष्टींशी घेणंदेणं नाही. गुन्ह्याशी संबंधित गोष्टीवर आमचा भर राहणार आहे. आम्ही कागदपत्रांच्या आधारे बोलणार आहोत, असंही घरत यांनी सांगितलं.

मुख्य सूत्रधार नितेश राणे

संतोष परब यांच्यावतीने अ‍ॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी बाजू मांडली. फिर्याद कशी खरी आहे. कुणाला अडकवायचं असतं तर मी कधीच केस घेतली नसती. त्याच्यावर झालेला हल्ला जीवघेणी होता. ती अपघाताची घटना असती तर गाडी थांबते. पण या ठिकाणी तसं नव्हतं. इथं वार केला. तो छातीवर होता. यातील मुख्य सूत्रधार हा नितेश राणेच असल्याचं आम्ही कोर्टासमोर मांडलं, असं अ‍ॅड. विकास पाटील शिरगावकर यांनी सांगितलं.

दुसरीकडे नितेश राणेंच्या वकिलांनीही माध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया दिलीय. नितेश राणेंना या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याकरिता त्यांना अटकपूर्व जामीन मिळायला हवा, असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलंय.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर अटकेची टांगती तलवार असल्याने नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या समोर ही सुनावणी झाली. नितेश राणे यांच्यावतीने अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी युक्तिवाद केला. तर, सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली. तब्बल साडेतीन तास कोर्टाने युक्तिवाद ऐकून घेतला. यावेळी कोर्टाची कामकाजाची वेळ संपल्याने राणेंच्या वकिलाने कोर्टाची वेळ वाढवून देण्याची मागणी केली. काही वेळ राणेंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button