राजकारण

आ. नितेश राणे अखेर १८ दिवसांनंतर अज्ञातवासातून बाहेर

अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनिष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचे अभिनंदन करण्यासाठी भाजपचे आ. नितेश राणे बँकेत दाखल झाले. नितेश राणे दाखल होताच भाजपच्या स्थानिक कार्यकर्तांनी राणेंना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले, त्यांनंतर दमदार अंदाजात राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत प्रवेश केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तब्बल १८ दिवासानंतर नितेश राणे अज्ञातवासातून बाहेर आले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून नितेश राणे दूर होते. मात्र, १८ दिवसानंतर त्यांनी बँकेमध्ये हजेरी लावल्यानंतर चर्चेला उधाण आलंय.

संतोष परब हल्लाप्रकरणी त्यांच्यावर अटकपूर्व जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. परंतु ही सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने सोमवारपर्यंत नितेश राणेंना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाची वेळ संपल्यामुळे १७ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली असून याच दिवशी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे अटकेची त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु हायकोर्टाने त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षणाचा दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस होता. जिल्हा बँकेवर अध्यक्षपद मनीष दळवी झाले असून भाजपचे वर्चस्व आले आहे. परंतु नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सिंधुदुर्गातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे षडयंत्र असल्याचे पोलीसांच्या चौकशीमध्ये समोर आले आहे. तसेच आमदार नितेश राणे यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर नितेश राणे गायब झाले आहेत. त्यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यानंतर वकील संग्राम देसाई यांनी हायकोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button