निलेश राणे, संजय काकडे यांच्याकडे पाणीपट्टीची तब्बल ८३ लाखांची थकबाकी
पुणे : पुणे महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या ८५७ जणांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या यादीत दोन माजी खासदारांची नावे असून अनेक नामांकित शिक्षण संस्था सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून नोटीस बजावली आहे.
पाणीपट्टी थकवणाऱ्यांच्या यादीत भाजपचे नेते निलेश राणे आणि संजय काकडे या भाजप नेत्यांसह अनेक नामांकित आणि त्यांच्याशी संबंधित संस्था इमारती यांचा समावेश आहे. खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनच्या थकबाकीने दोनशे कोटींचा आकडा गाठला आहे.
– एक कोटी पेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्याची संख्या आहे ८६ आणि थकीत रक्कम आहे २२ कोटी
– १० लाख ते १ कोटी दरम्यान रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे २५४ आणि थकीत रक्कम आहे ५८ कोटी ८१ लाख
– पाच लाख ते दहा लाख रक्कम थकित असलेल्यांची संख्या आहे १०२७ यांनी थकीत रक्कम आहे ६० कोटी रुपये
– तीन लाख ते पाच लाख रक्कम थकित असणाऱ्यांची संख्या आहे १३३६ आणि थकीत रक्कम आहे ५२ कोटी १५ लाख
थकबाकीदारांमध्ये माजी खासदार निलेश नारायण राणे यांची सुमारे १७ लाख रुपये, संजय काकडे यांच्या मालकीच्या कंपन्यांचे सुमारे ६६ लाख रुपये, पुणे पोलीस आयुक्तालय आणि इतर इमारती यांच्याकडे सुमारे लाख रुपये थकीत आहेत.
त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जर २५ जूनपर्यंत थकबाकी भरली नाही तर पाण्याच्या जोडण्या कापण्यात येणार असल्याचं या नोटीसमध्ये सांगण्यात आल आहे. मात्र, वसुलीसाठी महापालिका प्रशासनावर अनेकदा बड्या धेंडाकडून दबाव येत असल्यामुळे थकित रक्कमेची वसुली करणे महापालिकेला शक्य होऊन बसते.