मोटाभाई रेस्ट हाऊसच्या व्हीआयपी सूटमध्ये सोफ्यावर बसून समोर ठेवलेला सुकामेवा खात वारंवार
भिंतीवरच्या घड्याळीकडे पाहून अस्वस्थ होत आहेत. ‘साला, दिवाल घडियाल भले गमे तेटलूं जूनूं होय , ज्यांं सुधी ते चालु छे त्यां सुधी तमारे तेने जोवु पडशे.’ असा चीड आणणारा विचारही त्यांच्या मनात डोकावून जातो. तेवढ्यात एक काळा बुरखा दार किलकीलं करत हळूच आत डोकावतो.
मोटाभाई – (एकदम घाबरून ओरडत) कोन छे ? कोन छे बुरखामा ?
भानामतीकर साहेब – ( बुरख्यातून , हळू आवाजात) हुं तमारो मित्र छुं . महाराष्ट्रातून आलोय .
मोटाभाई – (एकदम ओळखत) अरे , आओ भाई , केटलो समय लाग्यो ?
दोन्ही काळे बुरखे पट्टदिशी आत येत दाराची कडी आतून घट्ट लावून घेतात आणि काळे बुरखे काढून फेकतात.
भा. सा. – इतर दोघांना टांग मारून यायचं म्हणजे उशीर होतोच थोडा. कधी रात्र होते तर कधी पहाट होते.
मोटाभाई – बराबर . परंतु हा साथे कोण छे ?
भा. सा. – हे माझे मित्र आहेत. फुल्ल पटाले . कुठेही पटवापटवी करायची असली की मी यांना पुढे करतो. नावाप्रमाणेच आहेत ते. कोणालाही पटवून टाकतात.
मोटाभाई – ( दोघांकडे निरखून पाहत ) खाली हात आये हो ? कुछ ‘खोका वका’ नही लाये क्या ?
भा. सा. – ( भांबावून ,मिठाईचा पुडा देत) हे काय , बंगालच्या शुभेच्छा देण्यासाठी बंगाली मिठाई आणली आहे ना खास तुमच्यासाठी.
मोटाभाई – ( रोखून पाहत) हमारे लिये बंगाली मिठाई लाये हो , वो बंगाल की दीदी के लिये क्या खमन ढोकला ले जानेवाले हो क्या ? अरे, तुमची फक्त बंबई मधली सो करोडची वसुलीचा हिसाब बघून तुमच्याशी महाराष्ट्रमें पार्टनरसिप करनेका सोचा और तुम हमको बंगाली मिठाई देकर खुस करता ?
भा.सा. – ( ओशाळून) कसले शंभर करोड घेऊन बसलात , बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी .
मोटाभाई – (फुल्ल पटालेकडे पाहत) मने खबर नथी के ते शुंं वात करे छे .
फु. प. – कहेवुं छे त्यां मात्र बोंबमारो थयो हतो . खरेखर तेना हाथमां कई पड्यु नही. आवी समज , ‘ खाया पिया कुछ नही , ग्लास फूटा बारा आना !’
मोटाभाई – (अविश्वासाने ) ऐसा कैसा होगा भाई ? अभी से आप लोग झूठ बोलोगे तो पार्टनरसिप कैसे होगी ?
फु. प. – (समजावून सांगत) वो आपने दिल्लीवाली टीम भेजनेकी जरा जल्दी कर दी ना मोटाभाई. हमारे हाथ कुछ लगने के पहले ही उन्होंने ‘उसे’ उठा लिया . अब तो ‘ भिख मांगती नथी पन कुतरोनो समय’ ऐसा हो गया है , मोटाभाई. तुम्ही अजिबात चिंता करू नका. एकदा आपली ‘डील’ झाली की , सगळा बॅकलॉग भरून काढू. तुमची तबियत खुश होऊन जानार . एकदा चान्स द्याच पण.
मोटाभाई – कोई प्रश्न नथी , पन आमच्यामुळे एवढ्या मोठ्या गल्ल्यावर बसायला मिलते आहे तर पहले आम्हाला खुस नको करायला ? पटाले, तमे त गुजराती मानस छे . वेपारी. तमे जानवा मांगो छो.
भा. सा. – ( विषय बदलत) आपण दोस्तीची ‘शपथ’ घेतली की यांनाच बसवू गल्ल्यावर . गुजराती माणूस , एकदम प्रामाणिक माणूस.
मोटाभाई – (एकदम आठवल्यासारखं करत ) वो बहत्तर घंटों में भाग जानेवाला किधर है ?
भा. सा. – त्याला सध्या दुधाच्या भांड्याजवळ बसवलं आहे , कोणी आमच्या दुधात मिठाचा खडा तर टाकत नाही ना , त्याच्यावर नजर ठेवायला.
मोटाभाई – ( खवळून ) अरे, तुम्हारा सब गड़बड़ लगता है , व्यवहार भी और दिमाग भी . जाओ पहले किसी होस्पिटल में जाकर चेकअप करालो . फिर बात करते है .
परतीच्या प्रवासात ,विमानात –
फु. प. – साहेब ही भेट नक्की कशासाठी होती ? काय फायदा झाला आपल्याला ?
भा. सा. – ही भेट कशासाठी होती ते मिडियावाले शोधतील ! आणि फायदा असा झाला की, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची नवी आयडिया मिळाली . आता मीडियाला चघळायला नवा विषय मिळेल आणि मला विश्रांती ! कोणत्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला नको !