अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन
वॉशिंगटन : राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांच्या वरिष्ठ सल्लागारपदी भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची निवड करण्यात आली आहे. याआधी टंडन यांच्यावर झालेल्या टीकेमुळे ऑफिस ऑफ मॅनेडमेंट ऍंड बजटचे नेतृत्व करण्यास त्यांनी नकार दिला होता.
सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस (CAP) च्या संस्थापक जॉन पोडेस्टा यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागाराच्या रुपात बुद्धीमान, कर्तुत्ववान, राजकीय समज असलेली महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून नीरा स्वतःला नक्की सिद्ध करेन. CAP ला आता त्यांचे नेतृत्व लाभणार नाही याची आम्हाला खंत आहे. नव्या जबाबदारीसाठी त्यांना शुभेच्छा! याआधी मार्चमध्ये व्हाईट हाऊस OMB च्या निर्देशक म्हणून त्यांनी आपले नामांकन परत घेतले होते. सिनेटमध्ये त्यांच्या नाव न आल्याने त्यांनी कमी मते मिळाली होती. व्हाईट हाऊस बजट कार्यालयचे नेतृत्व करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची पहिली पसंत नीरा या होत्या.