Top Newsराजकारण

दारुबंदीच्या मुद्द्यावरुन रुपाली चाकणकरांचा फडणवीसांवर निशाणा

पुणे: चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. चाकणकर यांनी फडणवीस यांच्या सभागृहातील भाषणाचा एक जुना व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळत आहे.

दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल, असा देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा आशय आहे. मात्र, ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवल्यानंतर भाजपचे नेते महाविकास आघाडीवर तुटून पडले आहेत.

ठाकरे सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती. दारूबंदी उठवावी अडीच हजार निवेदने दिली होती. अवैद्य आणि डुप्लिकेट दारू जिल्ह्यात विकली जात होती. त्यामुळं दारूबंदीचे दुष्परिणाम दिसू लागले होते. यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी यासंदर्भात अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला होता. हा अहवाल मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button