इतर

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा बसवर हल्ला; ३ जवान शहीद, ८ गंभीर जखमी

नारायणपूरः छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी DRG आणि ITBP च्या जवानांनी भरलेल्या बसला नक्षलवाद्यांना स्फोटांनी उडवून दिलीय. या स्फोटात 3 जवान शहीद झाले असून, 8 गंभीर जखमी आहेत. नक्षलवाद्यांनी काडेनर आणि मांडोडाजवळ जवानांच्या बसला लक्ष्य केले. जवान आपले ऑपरेशन पूर्ण करून परतत असतानाच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

छत्तीसगडचे डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात DRG च्या (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले की, या हल्ल्यात 3 डीआरजी जवान आणि एक पोलीस शहीद झाला असून, 14 जवान जखमी झालेत. दोन जवानांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. छत्तीसगडचे डीएम डीएम अवस्थी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या IED स्फोटात डीआरजी (जिल्हा राखीव गार्ड) जवानांचा मृत्यू झाला आणि काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी जवानांना नारायणपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये IRB च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीआरजी जवानांना घेऊन निघालेल्या बसमध्ये IED स्फोट झाला. हा स्फोट अत्यंत भीषण होता आणि त्यात 3 जवान शहीद झालेत. बसमध्ये एकूण 27 सैनिक होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा परिसर घेरला गेला असून, जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यात आलेय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button