राजकारण

सामनाचा ‘सामना’ कसा करायचा ते नंतर ठरवू; नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला

मुंबई : राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले असताना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. आता सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. सामनाचा ‘सामना’ पुढे कसा करायचा हे ठरवू, असं सूचक विधान करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना आणि खा. संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावण्यात आले आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या ‘सामना’मध्ये काय लिहिले आहे, ते बघून सामनाचा सामना पुढे कसा करायचा हे योग्य प्रकार ठरवू, असा टोला नाना पटोले यांनी राऊत यांना लगावला.

भाजपचे आमदार आशिष शेलार सांगायचे जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी परिवार टीका केली, ७० वर्षांत काँग्रेसने काय केले, काँग्रेसने देश निर्माण केला आहे पण आता पंतप्रधान मोदी स्वत:चे घर उभे करत आहे, असा टोलाही पटोले यांनी भाजपला लगावला. लोकांना वाचवण्यापेक्षा लोकांना संपवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारने लशीबाबत खोटी माहिती कोर्टात सादर केली आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.

कोर्टाच्या आदेशाने पदोन्नती रद्द झाली, यावर आम्ही पक्ष म्हणून नंतर बोलू आता लोकांचे जीव वाचणे कोरोना विषय महत्वाचा आहे. लॉकडाऊन कालावधी वाढत असेल तर हातावर पोट असणारे लोक यांची व्यवस्था केली पाहिजे, सरकारने त्यानंतर लॉकडाऊन वाढविण्याची भूमिका घ्यावी, असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला.

महाराष्ट्रातले काँग्रेस पुढारी आपण ‘सामना’ वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात हा त्यांचा प्रश्न, पण सोनिया गांधी ‘सामना’ची दखल घेतात, हे काल पुन्हा दिसून आले. काँग्रेसला आसाम, केरळमध्ये चांगली लढत देऊनही सत्तेवर का येता आले नाही? हा प्रश्न ‘सामना’ने याच स्तंभातून विचारला. नेमका काँग्रेस कार्य समितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. केरळ, आसामातील पराभव त्यांना टोचला व त्यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील जुन्याजाणत्या काँग्रेस पुढाऱ्यांनीही ‘सामना’ वाचून सोनियांपर्यंत लोकभावना पोहोचवल्या असतील तर चांगलेच आहे, असं म्हणत सेनेनं काँग्रेसला टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button