Top Newsराजकारण

राजकीय संघर्ष बाजूला ठेवून मुंडे बहिण-भाऊ एकत्र !

लातूर : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रे आणि शरद सोनहिवरे यांचा विवाहसोहळा लातूर येथे विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्रित दिसून आले. लातूर शहराजवळ असलेल्या हॉटेल कार्निवल या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडला.

बीडमधील मुंडे भावा-बहिणीचा राजकीय वैर आजपर्यंत साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. गेल्याच आठवड्यात पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्यात कायमच शाब्दिक युद्ध सुरू असते. मात्र या विवाह सोहळ्यात दोघे एकत्र पाहायला मिळाले. खरतर अनेक वेळा हे बहिण भाऊ एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. मात्र या लग्न सोहळ्यामध्ये जवळपास दोन तास पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्रित बसले होते. धनंजय मुंडे यांच्या भाचीचा विवाह असल्यामुळे धनंजय मुंडे हे सकाळपासूनच उपस्थित होते. दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आई प्रज्ञाताई यांच्यासोबत हजेरी लावली.

यापूर्वी अनेक वेळा धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे व्यासपीठावर काही वेळा एकत्रित आले असले तरी आज मात्र त्यांच्यामध्ये होणारा संवाद हा सगळ्यांसाठीच नवीन होता. कारण मागच्या अनेक दिवसांपासून राजकीय संघर्ष असलेल्या बहीण भावामध्ये अपवादानेच इतका वेळ संवाद पाहायला मिळाला होता.

लग्न समारंभानंतर परिवारासोबत जेवण्यासाठी पंकजा मुंडे आणि प्रज्ञाताई पोहोचल्या त्यावेळी त्यांनी स्वतः पंकजा आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा जेवणासाठी आग्रह केला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र बसून जेवण केले. मागच्या अनेक दिवसापासून परिवारातील सदस्यासोबत मनमोकळ्या गप्पा यापूर्वी झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. या लग्न सोहळ्यात मात्र परिवारातील सगळे सदस्य एकत्रितपणे पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button