Top Newsमनोरंजनराजकारण

खा. अमोल कोल्हे यांनीही अभिनेत्री कंगना रणौत, विक्रम गोखलेंना सुनावले

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळे देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या विधानावरुन संताप व्यक्त होत आहे. देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्या अगोदरचं स्वातंत्र्य हे भीकमध्ये मिळालं होतं, असं वादग्रस्त विधान कंगनाने केलं होतं. कंगनाच्या या विधानावरुन देशभरातून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. कंगणा रणौतला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे आणि या देशातून तिची हाकालपट्टी केली पाहिजे, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं. तर, खासदार अमोल कोल्हेंनीही कंगनाच्या विधानावर भाष्य केलंय.

कंगनाच्या विधानासंदर्भात खासदार कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, एका शब्दात ‘दुर्दैव’ अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली. तसेच, ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अवघ्या २३ व्या वर्षी फासावर असणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. गेल्या ७५ वर्षात देश ज्या उत्क्रांतीतून गेलाय, त्या अनुषंगाने हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलाय, त्यांचा हा अपमान आहे. ज्यांनी हे विधान केलंय, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये, देशाचा अपमान करू नये, असे डॉ. खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.

विक्रम गोखलेंनाही सुनावले

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात कंगनाच्या विधानाचं समर्थन केल्यानंतर सोशल मीडियातून त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका केली. अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही एका वाक्यातून त्यांच्यावर निशाणा साधला. आता, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही त्यांच्या हा देश भगवा आहे, या विधानावरुन त्यांना चांगलंच सुनावलंय. कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी विचारला. तसेच, मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसुदैवं कुटुंबकमला तिलांजली देता, असे म्हणत अमोल कोल्हे यांनी अभिनेता विक्रम गोखलेंना प्रत्युत्तर दिलंय.

काय म्हणाले विक्रम गोखले

आज मराठी माणूस भरडला जात आहे. सध्याचे सरकार हे चुकलेले गणित आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी महाआघाडी सरकारवर केली. हे गणित सुधारण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप व शिवसेनेने एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच, सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही, असे गोखले यांनी म्हटले. तर, कंगनाने देशाच्या स्वातंत्रतेबद्दल केलेल्या विधानाचेही त्यांनी समर्थन केलं आहे. त्यामुळे, ते सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहेत.

देश संकटाच्या उंबरठ्यावर असताना भाजप आणि सेनेने एकत्र आले पाहिजे. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या हिंदूंमध्ये जाणीवपूर्वक तेढ वाढवली जात आहे. आपण हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. तरुणाईला गाफील ठेवण्यासाठी इतिहास बदलण्याचे षडयंत्र चालू आहे. या दुष्कृत्यांना आळा घालण्याची वेळ आली आहे. माझा देश भगवाच राहील, हिरवा कधीही होणार नाही. आम्ही तसे होऊच देणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व राजकीय पक्ष फायद्यासाठी हिंदू-मुस्लीम, मराठा-ब्राह्मण, मराठा-दलित, दलित-ब्राह्मण तेढ निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला.

‘पद्म पुरस्कार येत आहे; स्वरा भास्करने साधला विक्रम गोखलेंवर निशाणा

भारताच्या स्वातंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. भारताला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं असं वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीत केलं होतं. तिच्या या वक्तव्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. मात्र, ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांनी कंगनाची पाठराखण केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे विक्रम गोखले यांनी कंगनाला पाठिंबा दिल्यानंतर आता अभिनेत्री स्वरा भास्करने विक्रम गोखलेंवर निशाणा साधला आहे. स्वराने एएनआयचं एक ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये विक्रम गोखले प्रसारमाध्यमांसमोर बसल्याचं दिसून येत आहे. सोबतच तिने “पद्म पुरस्कार येत आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button