धक्कादायक! देशात २४ तासांत १ लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण
नवी दिल्ली : देशातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून, रविवारचा उच्चांक मोडीत निघाला असल्याचे सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात १ लाख ३ हजार ५५८ नवीन रुग्ण आढळून आले असून, ४७८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजार ८४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत १ कोटी १६ लाख ८२ हजार १३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ७ लाख ४१ हजार ८३० इतकी आहे. आतापर्यंत देशात १ कोटी २५ लाख ८९ हजार ०६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १ लाख ६५ हजार १०१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७ कोटी ९१ लाख ०५ हजार १६३ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.