७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा देशभरात उत्साह मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला आहे. देशात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करून स्वातंत्र्याला आणि आपल्या राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. प्रथेप्रमाणे या वर्षी देखील पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं गेलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये कोरोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयी देखील त्यांनी मत मांडलं. मात्र, यावेळी देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे. लष्करात मुलींची संख्या वाढविण्यासाठी आणि महिला व पुरुष समता स्थापित करण्यासाठी सैनिकी शाळांमध्ये आता मुलींना प्रवेश दिला जाणार असल्याची ऐतिहासिक घोषणा लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी केली.
भारताच्या मुली प्रत्येक क्षेत्रात आजकाल चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे देशातील सर्व सैनिक स्कूल मुलींसाठी खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात सर्वच क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने दिसत असताना सेनेमध्ये मात्र हे प्रमाण बरंच व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर लष्करामध्ये आपलं भविष्य घडवण्याचं स्वप्न पाहाणाऱ्या मुलींसाठी मोदींनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश सुरू करण्याचा निर्णय मोदींनी यावेळी जाहीर करून स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्वाचं पाऊलं टाकलं.. मुलांप्रमाणे मुलीना देखील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश मिळावा स्त्री पुरुष ही दरी किंवा भेद कमी व्हावा या दृष्टीने हा एक महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेऊन देशातील मुलींना सैंनिकी शाळा खुली करण्याचा निर्णय जाहीर केला. आता मुली देखील सैनिक शाळांमध्ये शिकू शकतात. त्यांच्यासाठी देखील सैनिक शाळांचे दरवाजे उघडले जाणार आहेत. दोन-अडीच वर्षांपूर्वी मिझोरामच्या सैनिकी शाळांमध्ये पहिल्यांदा मुलींना प्रवेश देण्याचा छोटासा प्रयोग केंद्र सरकारने या आधी सुरू केला होता. सैनिक स्कूल छंगछी, मिझोरम येथे शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला होता. आता २०२१ -२२ या शैक्षणिक वर्षापासून सर्व शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहेत, असं सरकारने स्पष्ट केले होते. पहिलं सैनिक स्कूल महाराष्ट्रातील सातारा येथे स्थापन झालं हे विशेष.!
विद्यार्थ्यांना शालेय दशेतच सैन्य शिस्तीचे धडे देत त्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए), नेव्हल अकादमी (एनए) अथवा आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) या अधिकारी तयार करणाऱ्या अकादमींच्या प्रवेश परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने सन १९६१ मध्ये सैनिकी शाळा सुरू झाल्या. आत्तापर्यंत फक्त मुलांसाठी असलेल्या या शाळांमध्ये आता २०२०-२१ या वर्षापासून मुलींनाही प्रवेश मिळणार आहे.
आता सरकारने ठरवलं आहे की देशातल्या सर्व सैनिकी शाळांना देशातील मुलींसाठी देखील उघडलं जाईल. देशातल्या सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुली देखील शिकतील, असं मोदींनी यावेळी जाहीर केलं. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेत अजून एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकल्याच्या भावना देशभरातून व्यक्त होत आहे. सैनिकी शाळा सैनिक स्कूल सोसायटीमार्फत चालवल्या जातात. संरक्षण मंत्रालयाचं सैनिक स्कूल सोसायटीवर संरक्षण मंत्रालयाचं नियंत्रण असते. सैनिकी शाळांमध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत हा महत्वाचा निर्णय आहे.
काय आहे सैनिकी शाळा?
इयत्ता बारावीनंतर दिल्या जाणाऱ्या एनडीए, एनए किंवा एएफएमसीसाठीच्या प्रवेश परीक्षा या देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असतात. विद्यार्थ्यांना त्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने सन १९६१मध्ये सैनिकी शाळा सुरू झाल्या. संरक्षण मंत्रालयांतर्गत यासाठी सैनिकी शाळा सोसायटीची स्थापना झाली. प्रत्येक राज्यात एक अशी शाळा सुरू करण्यात आली. त्यानुसार जून १९६१मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने साताऱ्यात ही शाळा सुरू झाली. काही राज्यांत अशा दोन शाळा आहेत. महाराष्ट्राचाही त्यात क्रमांक आहे. साताऱ्याखेरीज दुसरी शाळा चंद्रपुरात आहे.
चंद्रपूर शाळेचा इतिहास
विदर्भातील मुले सैन्यदलात अधिकारी म्हणून जावीत या उद्देशाने चंद्रपुरात दोन वर्षांपूर्वी ही सरकारी सैनिकी शाळा सुरू झाली. या सैनिकी शाळांसाठी राज्य सरकारदेखील अनुदान देत असते. यासाठीच राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्री य नात्याने चंद्रपुरात ही शाळा आणली. मूळ वर्धेचे असलेले व सर्जिकल स्ट्राइकचे मराठी ‘हिरो’ लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांनीही ही शाळा उभी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सैनिकी शाळेत दरवर्षी सहावी व नववीमध्ये प्रवेश घेता येतो. प्रवेश परीक्षा तसेच वैद्यकीय तपासणीद्वारे विद्यार्थ्यांची निवड होते. यामध्ये आता मुलींनाही प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक घोषणेनंतर आता २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मुलींना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेता येईल.