Top Newsमनोरंजन

मोबिलचा यंदाच्‍या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘८३’सोबत सहयोग

मुंबई : मोबिल या भारतातील आघाडीच्‍या इंजिन ऑईल ब्रॅण्‍डने वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘८३’सोबत सहयोग केला आहे. हा चित्रपट यंदा नाताळच्‍या वेळी चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय प्रेक्षक या स्‍पोर्टस् ड्रामाच्‍या माध्‍यमातून १९८३ क्रिकेट विश्‍वचषकामधील ऐतिहासिक विजयाला उजाळा देतील. हा चित्रपट निश्चितच देशभरात देशभक्‍तीपर वातावरण निर्माण करेल. रणवीर सिंग अभिनीत चित्रपट ‘८३’घोषणा केल्‍यापासून खूपच चर्चेत राहिला आहे. निर्मात्‍यांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होण्‍याबाबत पुष्‍टी दिल्‍यापासून चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हा चित्रपट १९८३ विश्‍वचषक स्‍पर्धेमधील १४ प्रेरणादायी खेळाडूंच्‍या प्रवासाला आणि कपिल देव यांच्‍या कर्णधारपदांतर्गत मिळवलेल्‍या ऐतिहासिक विजयाला दाखवेल. रणवीर सिंग कपिल देव यांच्‍या भूमिकेत दिसणार आहे. इतर कलाकार आहेत ताहिरराज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खत्तर, अम्मी विर्क, अदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी. तसेच दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्‍नी रोमीच्‍या लहानशा भूमिकेत दिसणार आहे.

मोबिल या चित्रपटासाठी अधिकृत इंजिन ऑईल सहयोगी आहे. हा सहयोग ब्रॅण्‍डच्‍या ‘फरक लाकर देखिए’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रमांपैकी एक आहे, ज्‍यामधून प्रेक्षकांना बदल घडवून आणण्‍यास आणि बदल पाहण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍यात येत आहे. या सहयोगाबाबत बोलताना एक्‍सॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपांकर बॅनर्जी म्‍हणाले, ”आम्‍हाला चित्रपट ‘८३’सोबत सहयोग करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो. मोबिल ‘फरक लाकर देखिए’ मोहिमेच्‍या माध्‍यमातून समाजामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती प्रबळ समर्थक राहिली आहे. १९८३ मध्‍ये भारतीय संघाने विश्‍वचषकामध्‍ये मिळवलेल्‍या विजयामुळे भारतीय क्रिकेट व क्रीडामध्‍ये बदल घडवून आला, सोबतच राष्‍ट्रीय आत्‍मविश्‍वास व आशावादाला चालना मिळाली. यंदा डिसेंबरमध्‍ये आम्‍ही भारताच्‍या यशाच्‍या कथानकाला सादर करत आहोत. हे क्रिकेट-चित्रपटाचे संयोजन भारतीयांना उत्‍साहित करते आणि आम्‍हाला भारतीय ग्राहक, व्‍यापार सहयोगी व कर्मचा-यांसोबत उत्तमप्रकारे संलग्‍न होण्‍यास मदत करेल.”

रिलायन्‍स एंटरटेन्‍मेंट व फॅन्‍टम फिल्‍म्‍स प्रस्‍तुत ‘८३’, कबीर खान फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शन या चित्रपटाचे निर्माते आहेत दीपिका पदुकोण, कबीर खान, विष्‍णू वर्धन इंदुरी, साजिद नादियादवाला, फॅन्‍टम फिल्‍म्‍स, रिलायन्‍स एंटरटेन्‍मेंट आणि ८३ फिल्‍म लिमिटेड. चित्रपट ‘८३’चे दिग्‍दर्शन कबीर खान यांनी केले आहे. रिलायन्‍स एंटरटेन्‍मेंट व पीव्‍हीआर पिक्‍चर्सचा हा चित्रपट यंदा नाताळला २४ डिसेंबर २०२१ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्‍नड व मल्‍याळम या भाषांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

”मी मोबिलचे त्‍यांनी दिलेल्‍या पाठिंब्‍यासाठी आभार मानतो. ते चित्रपटासाठी ऑफिशियल इंजिन ऑईल पार्टनर म्‍हणून असण्‍याचा आनंद होत आहे. चित्रपट ‘८३’ भारतीय क्रिकेट इतिहासामध्‍ये सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणलेल्‍या प्रख्‍यात सुवर्ण टप्‍प्‍याला प्रशंसित करतो. ही बाब मोबिलचे तत्त्व ‘फरक लाकर देखिए’शी संलग्‍न आहे, ज्‍यामुळे स्‍वाभाविकपणे ते या सेलिब्रेशनमधील भागीदार आहेत,” असे ‘८३’चे दिग्‍दर्शक कबीर खान म्‍हणाले. चित्रपट ‘८३’ २४ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्‍ये प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button