Top Newsमनोरंजन

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप

मुंबई : मुंबईमध्ये अनेक नवे कलाकार चित्रपटात काम करण्यासाठी येत असतात. अशावेळी काही निर्माते आणि दिग्दर्शक संधी साधून नव्या महिला कलाकारांचे लैंगिक आणि मानसिक शोषण करतात. अनेक महिला बदनामीच्या कारणामुळे आवाज उठवत नाहीत. तर काही समोर येऊन घडल्या प्रकाराला वाचा फोडतात. अशाच एका महिलेनं हिंमत दाखवून मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना संपर्क साधला आणि निर्मात्यांना रंगेहाथ पकडून चोप दिला आहे. या निर्मात्यांनी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी माहिती दिली आहे.

मनसे चित्रपट सनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना एका अभिनेत्रीचा फोन आला होता. या अभिनेत्रीने त्यांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला होता. अभिनेत्रीने सांगितले की, तिला एका कास्टींग दिग्दर्शकाचा फोन आला होता. त्याने सांगितले की, तूला एका हिंदी चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं आहे. त्या चित्रपटात तुला लीड रोल पाहिजे असेल तर चित्रपटाच्या प्रोड्यूरला खुश करावे लागेल. प्रोड्यूर उद्या युपीतून मुंबईला येणार असून त्यांना खुश करावे लागेल असे त्या अभिनेत्रीने मनसे चित्रपट सनेचे उपाध्यक्ष पद्मराम राणे यांना सांगितले आहे. याबाबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिली आहे.

दिग्दर्शकाने सांगितलेली गोष्ट त्या मुलीने घरच्यांना सांगितले आणि घरच्यांनी मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क केला होता. पदाधिकाऱ्यांनी मला माहिती दिली यानंतर त्यांना ताबडतोब ट्रॅप करायला सांगितले आणि पोलिसांच्या स्वाधिन करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे अमेय खोपकर यांनी सांगितले आहे. यानंतर पदाधिकारी आणि त्या मुलीने ठाण्यामधील घोडबंदर रोडवर एका फार्म हाऊसवर गेले. या चारही लोकांना रंगेहात पकडून मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. याचा व्हिडिओ आणि फोटोही अमेय खोपकर यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत.

या ट्रॅपमध्ये ताब्यात घेतलेल्या ४ आरोपींकडे बंदुकीचे कट्टे सापडले आहे. गिरीजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव अशी या चौघांची नावे आहेत. तसेच हे चारही जन लखनौहून आले होते. मुलीच्या हिंमतीमुळे मनसेच्या सहकाऱ्यांनी या चौघांना ताब्यात घेतलं आहे. त्या मुलीचं नाव सांगणार नाही परंतु मुलीने दाखवलेल्या हिम्मतीला सलाम असल्याचे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button