धनंजय बेळे लिखित ‘एमएच १५’चे शनिवारी प्रकाशन
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/12/dhananjay-bele.jpg)
नाशिक : नाशिक नगरीला असलेल्या इतिहास, पुराणाची परंपरा आणि वर्तमान काळात नाशिकचे होणारे विकसन हा सर्वत्र चर्चेचा विषय असतो; यावर विशेष चिंतन करून भविष्यदर्शी भाष्य करणारे धनंजय बेळे लिखित ‘एमएच १५’ या पुस्तकाचे शनिवार, दि. २५ रोजी प्रकाशन होत आहे. हे पुस्तक शब्दमल्हार प्रकाशनच्या वतीने प्रकाशित होत आहे.
नाशिक नगरी विद्यमान काळात देशातील महत्त्वाची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे; पण या नगरीचा नेमका विकास कसा व्हायला हवा, हे रचनात्मक कार्य पुढे नेण्याची जबाबदारी कुणाची आहे आणि ती कुणीकुणी प्रत्यक्षात आणायला हवी याबद्दलचे विचार धनंजय बेळे यांनी प्रस्तुत ‘एमएच १५’ या पुस्तकात मांडले आहेत.
‘एमएच १५’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गंगापूर रोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी ३.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी पोलीस महानिरीक्षक व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य प्रतापराव दिघावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समस्त नाशिककरांनी या जिव्हाळ्याच्या विषयावरील पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन ‘एमएच १५’चे लेखक धनंजय बेळे आणि शब्दमल्हार प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे.