मुंबई : एनसीबीने मुंबईत आलिशान क्रूझवर गेल्या महिन्यात कारवाई करून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्याने खळबळ उडाली होती. त्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या कारवाया आणि अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आरोप प्रत्यारोपांच्या या लढाईला नवाब मलिक यांनी दिवाळीनिमित्त अर्धविराम दिला आहे. मात्र रविवारी भेटूया म्हणत मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत ट्विटमधून दिले आहेत.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, शुभ दीपावली. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. तुमची दिवाळी मंगलमय जावो. हॉटेल द लालितमध्ये अनेक रहस्ये दडलेली आहेत. रविवारी भेटूया, अशा शब्दात मलिक यांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत दिले आहेत.
शुभ दीपावली
आप सभी की दिवाली मंगलमय होहोटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…
मिलते है रविवार को— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 3, 2021
नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, आजही नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन वानखेडंवर नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे,’असे सूचक ट्विट मलिकांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. यात काहीजण मलिकांची बाजु घेत आहेत, तर काहीजण त्यांनाच ट्रोल करताना दिसत आहे. दरम्यान, या सूचक ट्विटवरुन मलिक नवा खुलासा करणार, असाही एक अंदाज लावला जात आहे.