Top Newsराजकारण

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी ठणकावले

उद्धव ठाकरे-पंतप्रधान मोदी भेटीवर शंका घेणाऱ्यांना फटकारले; शिवसेना विश्वासार्ह पक्ष

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ परवा पंतप्रधांनाना भेटलं. यावेळी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची एकांतात भेट झाली. त्यावर अनेकांनी तर्कवितर्क लढवले. शंकाकुशंका घेतल्या. या शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहे. शिवसेना हा सर्वात विश्वासहार्य पक्ष आहे, असं सांगतानाच महाविकास आघाडीतील सरकार पाच वर्षे टिकेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठणकावलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी हे विधान केलं. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकांतात भेटल्याने त्यावरून अनेक वावड्या उठल्या होत्या. त्याचं खंडन करत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री-पंतप्रधान एकांतात भेटले. त्यामुळे काही लोकांनी अनेक तर्कवितर्क लढवले. शंका घेतल्या. पण शंका घेणारे वेगळ्या नंदनवनात राहत आहेत. शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष आहे. लोकांच्या विश्वासावर हे सरकार काम करत आहे. त्यामुळे हे सराकर नुसतं टिकणारन नाही तर पाच वर्षे टिकेल, असं पवार म्हणाले. ओबीसी असो किंवा मराठा आरक्षण, हे प्रश्न सोडवावेच लागतील. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीवर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र त्या योग्य नाहीत, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज्य सरकार पडणार अशा वावड्या अनेकांनी उठवायला सुरुवात केली आहे. जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना मदत करण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पाळला. आताही शिवसेना वेगळी भूमिका घेणार नाही.

शरद पवार पुढे म्हणाले की, जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचा सगळीकडे पराभव होत असताना शिवसेना हा पक्ष काँग्रेसला पाठींबा देण्यासाठी पुढे आला. त्या वेळी शिवसेनेने काँग्रेसला मदत करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून शिवसेना विधानसभेसाठी एकही उमेदवार उभा करणार नाही असा बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना शब्द दिला आणि तो पाळला. हा इतिहास आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित काम करतात. माझा शिवसेनेसोबतचा पूर्वीचा अनुभव हा विश्वासाचा आहे. हे सरकार टिकेल, पाच वर्षे काम करेल. एवढंच नाही तर येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे तिनही पक्ष एकत्रित काम करतील यात शंका नाही.

राज्यात वेगळ्या विचाराचं सरकार स्थापन केलं. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येईल, असं लोकांना कधीच वाटलं नव्हतं. पण आपण एकत्र आलो. पर्याय दिला. लोकांनी हा पर्याय स्वीकारला असून आपली यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. कुणी काही म्हणो, सरकारची वाटचाल दमदार सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पक्ष आले, गेले, आपण २२ वर्षे टिकून

हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

आपल्या देशात अनेक पक्ष निर्माण झाले. काही टिकले, तर काही कधी गेले ते कळलंही नाही. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात ७० च्या दशकात पक्ष स्थापन झाला होता. या पक्षाची अकरा राज्यात सत्ता आली. पण दीड वर्षही हा पक्ष टिकू शकला नाही. आपण २२ वर्षे टिकून आहोत. १५ वर्षे आपण सत्तेत होतो. मधल्या काळात सत्तेत नव्हतो. त्याने काही फरक पडत नाही, असं पवार म्हणाले.

अनेक सोडून गेले, नवीन लोक तयार झाले

या दरम्यान, अनेक लोक आपल्याला सोडून गेले. पण नवीन लोक तयार झाले आहेत. नव्या लोकांचं कर्तृत्व कधीच दिसलं नव्हतं. त्यांना संधी मिळाली आणि त्यांचं कर्तृत्व समोर आलं. देशभर कोरोनाचं संकट असताना राजेश टोपेंनी चांगलं काम केलं. राजेंद्र शिंगणेही चांगलं काम करत आहेत. राजकारणात तरुणांना नेहमीच संधी दिली पाहिजे. पिढी तयार केली पाहिजे. राष्ट्रवादीने ही पिढी तयार केली आहे, असं त्यांनी सांगितलं.  आधी त्यांचं कतृत्व कधी दिसलं नाही पण या आता ते जबाबदारीने आपलं काम करत आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही अशी भावना शरद पवारांनी व्यक्त केली.

सत्ता ही महत्त्वाची आहे. पण एकाच ठिकाणी सत्ता राहता कामा नये. एकाच ठिकाणी सत्ता राहिली तर सत्ता भ्रष्ट होते. त्यामुळे सत्ता ही सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजे, त्यादृष्टीने प्रत्येकाने कामं केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button