कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने २ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्रातील देशातील एकमेव राज्य ठरले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राची विक्रमी घौडदोड पाहायला मिळत आहे.
काल राज्यात १ हजार २३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती समोर आली आहे. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान राज्यात आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ६ लाख ५५ हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. दरम्यान महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.
महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.17 मे 2021 रोजी 99,699 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/RoNMzBsWJH
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 18, 2021